मुंबईत पाणी कपात जैसे थे
मुंबई / प्रतिनिधी 1 जुलै 2016
मुंबईमधे पावसाची जोरदार सुरुवात झाली असली तरी मुंबईला पाणीपूरवठा करणार्या तलावामधे मात्र पाउस पडत नसल्याने पावसाची स्थिती चिंताजनक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्के कमी पाउस पडला असून यावर्षी फ़क्त 10 टक्केच पाउस पडल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.
मुंबई मधे गेले 10 दिवस सतत पाउस पडत आहे. मुंबईमधे सतत पाउस पडत असला तरी तलावामधे पाउस पडत नसल्याने 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा आहे. मागील वर्षी याच दिवशी 3 लाख 38 हजार 217 मिलीलिटर पाण्याची नोंद झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत 2 लाख 28 हजार मिलीलिटर कमी पाण्याची नोंद झाली आहे. दरवर्षी जितका पाउस पडतो त्या तुलनेत यावर्षी अद्याप फ़क्त 10 टक्के पावसाची नोंद झाली असल्याने 20 टक्के पाणी कपात यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
धरणातील पाणी साठा
2016 2015
मोडक सागर 12826 66869
तानसा 22225 29608
विहार 7702 8127
तुलसी 4320 4889
अप्पर वैतरणा 0 0
भातसा 35422 106125
मध्य वैतरणा 28124 122600
मोडक सागर 12826 66869
तानसा 22225 29608
विहार 7702 8127
तुलसी 4320 4889
अप्पर वैतरणा 0 0
भातसा 35422 106125
मध्य वैतरणा 28124 122600
एकूण 110619 338217
No comments:
Post a Comment