नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2016

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित

मुंबईदि. 30 : राज्यात डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 195 व 19 नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत किंवा मतदार यादीत आपल्याशी संबंधित तपशिलांत दुरुस्त्या असल्यास त्या कराव्यातअसे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केले.


सहारिया यांनी सांगितले कीविधानसभा मतदारसंघाची मतदार यादी भारत निवडणूक आयोगातर्फे तयार केली जाते. तीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी 10 सप्टेंबर 2016 रोजी अस्तित्त्वात येणारी विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 रोजी किंवा तत्पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. तरच त्यांना नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईलतसेच यापूर्वीच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतील तपशिलात बदल असल्यास त्यासाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचबरोबर दुबार नावे,स्थलांतरितांची नावे अथवा मृत व्यक्तींची नावे वगळण्यासाठीसुद्धा अर्ज करता येईल. त्यासाठीच्या अर्जांचे नमुने मतदार नोंदणी केंद्रतसेच मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

मतदार नोंदणीचा विषय भारत निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला असला तरी कुठलीही पात्र व्यक्ती नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम (NERP) राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारीतसेच नगरपरिषद व नगरपंचायतींना दिले आहेत. त्याचबरोबर सर्व स्तरांवर मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेआपापल्या क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राचाऱ्यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच मतदार नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करणेतसेच नागरिकांसाठी नगरपरिषदनगरपंचायतींच्या क्षेत्रांत आवश्यक तेवढे मतदार अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सहारिया यांनी दिली.
            
नोव्हेंबर- डिसेंबर 2016 मध्ये निवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींची नावे:  रायगड- उरणपनवेलखोपोली,पेणअलिबागमुरुड-जंजिरारोहाश्रीवर्धनमहाडमाथेरान गिरीस्थान. रत्नागिरी- दापोली न.पं.खेडचिपळूणरत्नागिरीराजापूर. सिंधूदूर्ग- वेंगुर्लासावंतवाडीमालवणदेवगड- जामसांडे न.प. (नवनिर्मित). पालघर- विक्रमगड न.पं. (नवनिर्मित)मोखाडा न.पं. (नवनिर्मित)तलासरी न.पं. (नवनिर्मित). पुणे- जुन्नरतळेगाव-दाभाडे,लोणावळाशिरुरआळंदीदौंडसासवडजेजुरीइंदापूरबारामती. सांगली- आष्टाविटातासगावइस्लामपूरपलूस नगरपरिषद (नवनिर्मित)कवठे-महाकाळ न.पं. (नवनिर्मित)कडेगाव न.पं. (नवनिर्मित)खानापूर न.पं. (नवनिर्मित)शिराळा न.पं. (नवनिर्मित).  सातारा- वाईफलटणम्हसवडरहिमतपूरकराडसातारामहाबळेश्वर गिरीस्थानपाचगणी गिरीस्थानकोरेगाव न.पं. (नवनिर्मित)मेढा न.पं. (नवनिर्मित)पाटण न.पं. (नवनिर्मित)वडूज न.पं. (नवनिर्मित),खंडाळा न.पं. (नवनिर्मित)दहिवडी न.पं. (नवनिर्मित). सोलापूर- करमाळाकुर्डूवाडीबार्शीपंढरपूरसांगोलामंगळवेढेअक्कलकोट,दुधनीमैंदर्गी. कोल्हापूर- वडगावइचलकरंजीजयसिंगपूरकुरुंदवाड,कागलमुरगुडगडहिंग्लजपन्हाळा गिरीस्थानमलकापूर. नाशिक- सटाणानांदगावमनमाडभगूरसिन्नरयेवला. अहमदनगर- कोपरगावशिर्डी न.प.राहताश्रीरामपूरराहुरीदेवळी-प्रवरासंगमनेर,पाथर्डी. धुळे- शिरपूर-वरवडेदोंडाईचा-वरवडे. नंदूरबार-  शहादा. जळगाव- चोपडायावलफैजपूरसावदारावेरभुसावळएरंडोल,धरणगावअमळनेरपारोळाचाळीसगावपाचोराबोदवड न.पं. (नवनिर्मित). औरंगाबाद-  कन्नडवैजापूरगंगापूरपैठणखुलाताबाद. जालना- भोकरदनजालनाअंबडपरतूर. परभणी- मानवतपाथरी,सोनपेठगंगाखेडपूर्णासेलूजिंतूर. नांदेड- माहूर नगरपंचायतअर्धापूर नगरपंचायतउमरीधर्माबादहदगावमुदखेडकुंडलवाडी,बिलोलीकंधारदेगलूरमुखेड. हिंगोली- हिंगोलीकळमनुरी,बसमतनगर. बीड- गेवराईमाजलगावबीडकिल्लेधारुरपरळी,आंबेजोगाई. लातूर- निलंगाउदगीरऔसाअहमदपूर. उस्मानाबाद- भूमकळंबनळदुर्गमुरुमउमरगापरांडाउस्मानाबादतुळजापूर.  अमरावती- अंजनगाव सुर्जीमोर्शीवरुडशेंदुरजना घाटचांदूररेल्वे,धामणगाव रेल्वेअचलपूरचांदूरबाजारदर्यापूर. अकोला- अकोट,मूर्तिजापूरतेल्हाराबाळापूरपातूर. बुलढाणा- जळगाव-जामोदशेगाव,नांदुरामलकापूरखामगावमेहकरचिखलीबुलढाणादेऊळगाव-राजा. वाशीम- कारंजावाशीममंगरुळपीर. यवतमाळ- यवतमाळ,दिग्रसपुसदउमरखेडघाटंजीवणीआर्णीदारव्हा. नागपूर- नरखेड,कळमेश्वरमोहपासावनेररामटेकउमरेडकामठी,  खापाकाटोल. वर्धा- देवळीआर्वीसिंदी रेल्वेपुलगावहिंगणघाटवर्धा. भंडारा- पवनी,भंडारातुमसरसाकोली नगरपरिषद (नवनिर्मित). गोंदिया- तिरोरा,गोंदिया. चंद्रपूर- मूलराजुराबल्लारपूरवरोरानागभिड नगरपरिषद, (नवनिर्मित) सिंदेवाही न पं (नवनिर्मित) गडचिरोली- देसाईगंज,गडचिरोली.

• मतदार म्हणून नाव नोंदणे- नमुना क्र. 6
• मतदार यादीतील नाव वगळणे- नमुना क्र. 7
• नाव व अन्य तपशिलांत दुरुस्ती - नमुना क्र. 8
• मतदारसंघ अंतर्गत पत्ता बदलविणे- नमुना 8 अ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad