मुंबई दि 28 July 2016 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदी झालेली नियुक्ती ऐतिहासिक आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रियमंत्रिमंडळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे कोणतेही नेतृत्व मागील सहा दशकांत स्थान मिळवू शकले नाही. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्रियमंत्रीमंडळात स्थान मिळविणारे रामदास आठवले हे रिपाइंचे एकमेव नेतृत्व ठरले आहे याबद्दल देशभर आनंद उत्सव आंबेडकरी जनतेने साजरा केला असून येत्या बुधवार दि 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार मुंबईत सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित केला असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजीत पत्रकार परिषदेत दिली
बुधवार दि 3 ऑगस्ट रोजी षण्मुखानंद सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ;उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी शिवसंग्राम चे प्रमुख आमदार विनायक मेटे स्थानिक खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .याच वेळी महायुतीचे राज्य सरकारमधील नवनियुक्त मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आले असून सर्व आंबेडकरी जनता या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे गौतम सोनवणे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment