मुंबई, दि. 11 : राज्यात दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना गंभीर व खर्चिकआजारांवरील मोफत उपचार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना 2 ऑक्टोबर, 2016 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.सध्या अस्तित्वात असलेली जीवनदायी आरोग्ययोजना 1ऑक्टोबर 2016 रोजी संपुष्टात येणार आहे. या योजने संदर्भात नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील पिवळे,अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजनाशिधापत्रिका धारक व दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारक (1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबे)तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे वनागपूर विभागातील वर्धा अशा एकूण चौदा शेतकरीआत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारककुटुंबे लाभार्थी असतील. या व्यतिरिक्त शासकीयआश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला,अनाथालये, वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेचअधिस्वीकृती धारक पत्रकार व त्यांच्या वर अवलंबूनअसणारी कुटुंबे यांचाही लाभार्थी घटकांमध्ये समावेशकरण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्ययोजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड,वाहन चालक परवाना तसेच चौदा शेतकरीआत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबासाठीत्यांच्याकडे असलेली शुभ्र शिधापत्रिका अथवा सातबाराउताऱ्याच्या आधारे ओळखपत्र म्हणून उपयोग करतायेईल. योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पध्दतीवरीलउपचारासाठी एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमासंरक्षण रक्कम प्रति कुटुंब रुपये दोन लाख एवढी असेल.तसेच मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब तीनलाख रुपये असेल. यामध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचासमावेश असेल.
योजनेमध्ये पूर्वीच्या 971 वैद्यकीय प्रक्रियांपैकीअत्यंत कमी वापर असलेल्या प्रक्रिया वगळण्यात आल्याअसून काही नवीन प्रक्रियांचा समावेश करण्यात आलाआहे. तसेच कर्करोग, बालक व वृध्दांवरील उपचार,सिकलसेल, ॲनिमीया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदींसाठीनवीन उपचारांचा समावेश करुन रक्तविकार शास्त्र याविशेषज्ञ सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100प्रक्रियांचा समावेश या योजनेत करण्यात येत असूनत्यामध्ये 127 पाठपुरावा सेवांचा समावेश असेल. तसेच111 प्रक्रिया शासकीय रुग्णालयांसाठी तसेच शासकीयवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये यांच्याकरिताराखीव ठेवण्यात आले आहे.
या योजनेची अंमलबजावणी सध्या अस्तित्वातअसलेल्या जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीमार्फतकेली जाईल. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीसार्वजनिक उपक्रमातील विमा कंपन्यांकडून निविदामागवून त्यातील पात्र विमा कंपनीची निवड करण्यातयेणार आहे. तसेच टीपीए कंपन्यांमार्फत अंगीकृतरुग्णालयांमध्ये आरोग्यमित्राची नियुक्ती करण्यात येणारआहे. त्याचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी,जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी यांच्याकडे राहणारआहे. त्यानुसार विमा कंपनीने प्रत्येक अंगीकृतरुग्णालयात पूर्णवेळ आरोग्य मित्र नियुक्त करणेआवश्यक राहणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी कॉलसेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. हे कॉल सेंटर्सप्रभावीपणे कार्यन्वित ठेवण्यासाठी त्यामध्ये आवश्यकसुविधा करणे तसेच देखभाल व दुरुस्ती करणे इ. बाबींचीजबाबदारी विमा कंपनीकडे राहणार आहे.
No comments:
Post a Comment