मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रानी सांगितले. मुंबई शहरातील लोकसंख्या 3 टक्यानी कमी झाली असून उपनगरात 8 टक्यानी लोकसंख्या वाढली आहे. यामुळे लोकसंखेच्या आधारावर शहरातील प्रभाग कमी होणार असून उपनगरातील प्रभाग वाढणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईमधे सन 2012 मधे 1 करोड़ 19 लाख 78 हजार 450 लोकसंख्या तर 1 करोड़ 2 लाख 86 हजार 579 मतदार होते. सन 2017 मधे 1 करोड़ 24 लाख 42 लाख 373 लोकसंख्या आहे यावेळी 11 लाखांनी मतदार कमी झाले असून 91 लाख 87 हजार 278 इतकेच मतदार असणार आहेत. मुंबई शहरात अंदाजे 24 लाख, पश्चिम उपनगरात 55 लाख तर पूर्व उपनगरात 45 लाख लोकसंख्या आहे. 55 हजार लोकसंखेसाठी एक नगरसेवक, यानुसार मुंबईमधे नगरसेवकांची शहरातील संख्या 63 वरुन 44, पश्चिम उपनगरातील संख्या 97 वरून 101 तर पूर्व उपनगरातील संख्या 67 वरुन 82 होण्याची शक्यता आहे.
मुंबईमधे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीची लोकसंख्या वाढल्यास आरक्षित जागांची संख्या वाढू शकते. 2012 मधे निवडणुकीसाठी 7639 पोलिंग बूथ होते त्यात यावेळी वाढ होणार आहे. एक किलोमिटरच्या आत निवडणूक बूथ असावेत याप्रमाणे येत्या निवडणूकीत 9 हजार पेक्षा जास्त पोलिंग बूथ असतील असे देशमुख यांनी सांगितले.
मतदार नोंदणी अभियान
सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करता यावे म्हणून 1 जानेवारी 2017 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. 1 जानेवारी 2016 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक युवतीनी मतदार म्हणून 31ऑगस्ट 2016 पर्यंत नावे नोंदवावीत. मयत व्यक्तीची, स्थलांतरीत नावे वगळने, नावांमधील चुका सुधारने ही कामेही यावेळी करण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगामार्फ़तही सप्टेंबर ओक्टोबर 2016 मधे मतदार पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. या मोहिमेत 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र ठरतील.
अधिक माहितीसाठी https://www.ceo.maharshtra. gov.in किंवा www.electionmsd.blogspot.in या संकेतस्थळाना भेट द्यावी. तसेच 1800-22-1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहान करण्यात आले आहे.
या मतदार नोंदणी अभियानाच्या जनजागृतीसाठी सिनेअभिनेते अशोक सराफ, प्रशांत दामले, स्वप्निल जोशी यांनी सहभाग घेतला असून यामधे लवकरच आणखी काही कलाकार सहभागी होतील असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले
No comments:
Post a Comment