विशेष नैपुण्य पुरस्कार 2016 साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2016

विशेष नैपुण्य पुरस्कार 2016 साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबईदि. 14 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विशेष नैपुण्य पुरस्कार 2016 साठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र व्यक्ती तसेच संस्था यांच्याकडून नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

4 ते 15 वयोगटातील मुलांच्या कल्याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता सलग 10 वर्ष वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय असे काम करणाऱ्या व्यक्तीस तसेच शिक्षण, कला, कार्य किंवा खेळामध्ये विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या व्यक्तीस विशेष नैपुण्य पुरस्कार दिला जातो.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर जिल्हा यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र व्यक्ती तसेच संस्था यांच्याकडून आपले नामांकन प्रस्ताव मागितले असून हे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर जिल्हा, 117 बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आवार, वरळी मुंबई-18 येथे सादर करावयाचे आहेत.
पुरस्काराबाबतची अधिक माहिती केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 022-24922484 येथे संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad