मुंबईच्या तलावात एका दिवसात 20 दिवसाचा पाणीसाठा जमा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2016

मुंबईच्या तलावात एका दिवसात 20 दिवसाचा पाणीसाठा जमा

मुंबई / प्रतिनिधी 4 July 2016
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात गेले तीन दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 3 जुलै रोजी पडलेल्या एका दिवसाच्या पाउसामुले तलावात 20 दिवसाचा पाणीसाठा जमा झाला आहे.    


1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता. 2 जुलैला 1 लाख 19 हजार 259 मिलीलिटर इतक्या पाण्याच्या साठ्याची नोंद झाली होती. 3 जुलैला 1 लाख 57 हजार 467 मिलीलिटर इतक्या पाणी साठा असल्याची नोंद झाली आहे. तर 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 2 लाख 27  हजार 827 मिलीलिटर इतक्या पाणी साठा असल्याची नोंद झाली आहे.

तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने एका दिवसात 70 हजार 306 मिलीलिटर इतका पाणी साठा वाढला आहे. 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या नोंदी प्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावात 97.00 मिलीलिटर, तानसा तलावात 110.00 मिलीलिटर, विहार तलावात  90.00 मिलीलिटर, तुलसी तलावात 93.00 मिलीलिटर, अप्पर वैतरणा तलावात 115.00 मिलीलिटर, भातसा तलावात 118.00 मिलीलिटर तर मध्य वैतरणा तलावात 162.30 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला दररोज 3750 दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. 3 जुलैला पडलेल्या पावसाने एका दिवसात तलावामधे 20 दिवसाचा पाणी साठा वाढला आहे. 

धरणातील पाणी साठा 4 जुलै 2016 सकाळी 6 वाजता
तलाव            दशलक्ष लिटर     पाऊस (मिलिमीटर)  मोडक सागर       24323           97.00
तानसा               39065         110.00
विहार                11212           90.00    
तुलसी                 6587            93.00
अप्पर वैतरणा            0          115.00
भातसा             114618        118.00
मध्य वैतरणा       32022         162.30
एकूण               2,27,827  दशलक्ष लिटर        
(मागील वर्षी याच दिवशी पाण्याचा साठा 326223 दशलक्ष लिटर इतका होता)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad