मुंबई, दि. 17: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य शासनातर्फे विधानसभेत दहा आणि विधानपरिषदेत तीन अशी तेरा विधेयके मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच राज्यात मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाला असून पेरण्याही मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या दि. 18 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापान कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पशुसंर्वधन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, बंदरे व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत दहा आणि विधानपरिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. यंदा राज्यात 1 जून ते 16 जुलै या कालावधीत सरासरी 419 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हा सरासरीच्या 104 टक्के पाऊस असून गेल्या वर्षी या कालावधीत याच काळात सरासरीच्या 58 टक्के पाऊस झाला होता. याकाळात राज्यातील 23 जिल्ह्यात 100 टक्के तर आठ जिल्ह्यात 76 ते 100 टक्के आणि तीन जिल्ह्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयात सध्या 34 टक्के पाणीसाठा असून गेल्यावर्षी तो 26 टक्के इतका होता. आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून दुबार पेरणीची तक्रार येणार नाही. यंदा पेरण्यांमध्ये डाळींचे क्षेत्र 135 टक्के तर तेलबियांचे क्षेत्र 125 टक्के आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना मागील वर्षीपेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून दिले आहे. दुष्काळाच्या काळात मदत करण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयांची मदत वाटप केली असून पीक कर्जाची सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. राज्यातील सर्वच विभागात पीक विम्यासाठी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कमी दरात पीक विमा मिळणार आहे.
राज्यात जलयुक्त शिवारचे काम चांगल्या प्रमाणात झाले असून 4 हजार गावांना याचा फायदा होत आहे. तसेच यंदा पाच हजार नवीन कामे सुरू करण्यात येणार आहेत. जागतिक बँकेच्या सहाय्यानेही एकात्मिक कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना दुर्देवी आहे. या पिडीत मुलीच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असून त्यांना शासनातर्फे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. तसेच या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कलमे लावण्यात आली असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावरील आरोपांचे त्यांनी खंडन केले.
राज्य शासनाने तूरडाळीच्या दर नियंत्रणासाठी कायदा तयार करून केंद्र शासनाकडे पाठविले आहे. यासंबंधी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याशी कालच बोलणे झाले असून त्यांनी हा कायदा लवकरात लवकर पारित करून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्य शासनाने ठरविलेली तूरडाळीची 120 रुपये ही कमाल दर असून त्यावर भाव वाढ होऊ नये, यासाठी हे केले आहे. त्यामुळे यासंबंधी करण्यात येत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणारे विधेयके पुढील प्रमाणे –
शासकीय विधेयकांची दि. 16.07.2016 रोजीची यादी
(एक) पटलावर ठेवावयाचे प्रख्यापित अध्यादेश
1. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 6.- महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2016) (रिझर्व्ह बॅंकेच्या मागणीनुसार किंवा सूचनांनुसार निष्प्रभावित केलेल्या विमा उतरवलेल्या सहकारी बॅंकेच्या बाबतीत समितीच्या सदस्यांना अनर्ह ठरविण्याची तरतूद करणे) (अध्यादेश क्र. 2/2016 पुनःप्रख्यापित)
२. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 7.- महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व दुस-यांदा पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2016 (कार्यलक्षी संचालकाच्या नियुक्तीबाबत तरतुदी, 25पेक्षा जास्त नियमित कामगार पटावर असणाऱ्या सहकारी संस्थेच्या समितीवर कामगार प्रतिनिधीची नियुक्ती, भाग भांडवलाच्या स्वरुपात शासनाचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थेच्या समितीवर शासनाच्या प्रतिनिधी व तज्ञ व्यक्तीची नियुक्ती याबाबत तरतुदी) (अध्यादेश क्र. 5/2016 पुनःप्रख्यापित)
3. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 8.- महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन(विकास व विनियमन) (सुधारणा व दुस-यांदा पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2016(बाजार समित्यांचे कार्य कार्यक्षमतेने व सुरळितपणे चालण्यासाठी अशा समित्यांवर तज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्याकरिता तरतुदी करणे) (अध्यादेश क्र. 4/2016 पुनःप्रख्यापित)
4. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9.- महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, 2016( महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये बहु-सदस्यीय प्रभाग पद्धतीची तरतुद करणे- नगर परिषदांच्या सर्वसाधारण निवडणुकांसोबत नगराध्यक्षाची थेट निवडणूकीने निवड करणे याबाबत तरतुदी)
5. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10.- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, 2016( जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या बाबतीत निम्म्याहून कमी उमेदवार निवडून आल्यास अशा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची फेर-निवडणूक घेण्याबाबत तरतुद करणे)
6. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 11 .- महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यादेश, 2016 (मुंबई महानगर प्रदेशाव्यतिरिक्त अन्य महानगर प्रदेशामध्ये MMRDA च्या धर्तीवर विकास प्राधिकरण स्थापन करणे) (नगर विकास विभाग)
7. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 12 .- महाराष्ट्र महानगर पालिका (सुधारणा) अध्यादेश, 2016 (महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या नागरीकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्याकरिता नवीन प्रभाग करण्याबाबत तरतुदी) (नगर विकास विभाग)
8. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 13.- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश, 2016 (जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे नव्याने घटन करण्याबाबत तरतुदी) (जलसंपदा विभाग)
9. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 14.- महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2016 (सन 2016-17 या शैक्षणिक वर्षाकरिता नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरु करण्याबाबत राज्य शासनाची मान्यता 15 जून 2016 ऐवजी 31 जुलै 2016 पर्यंत देता येईल याकरिता तरतुदी) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
10. सन 2016 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 15.- महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2016 (इ -पणन सुविधा उपलब्द्ध करुन देणे,फळे व भाजीपाल्याच्या व्यापाराचे उदारीकरण याबाबत तरतुदी, कृषी उत्पन्नावर एका ठिकाणीच फी बसविण्याची तरतूद करणे) (पणन विभाग)
(दोन) प्रस्तावित विधेयके
1. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2016 (मोडकळीला आलेल्या इमारतींमधील भाडेकरुना स्वतःच बांधकाम करण्याची परवानगी देणे (नगर विकास विभाग) (विधेयकाच्या प्रारुपाची तपासणी चालू)
2. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र डाळ (किंमतींचे नियमन व नियंत्रण) विधेयक, 2016 (अन्न व नागरी पुरवठा विभाग) (डाळींच्या किंमती वर नियंत्रण ठेवण्याकरिता तरतुदी (संविधानाच्या अनुच्छेद 304 च्या खंड (ख) च्या परंतुकान्वये विधेयक विधान सभेत मांडण्याकरिता आवश्यक असलेली मा. राष्ट्रपतींची पूर्वमंजुरी मागण्यात आली आहे)
3. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2016 ( महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये बहु-सदस्यीय प्रभाग पद्धतीची तरतुद करणे- नगर परिषदांच्या सर्वसाधारण निवडणुकांसोबत नगराध्यक्षाची थेट निवडणूकीने निवड करणे याबाबत तरतुदी) (अध्यादेश क्र. 9/2016 चे रुपांतर) (न.वि.वि.)
4. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2016 (जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या बाबतीत निम्म्याहून कमी उमेदवार निवडून आल्यास अशा जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची फेर-निवडणूक घेण्याबाबत तरतुद करणे) (अध्यादेश क्र. 10/2016 चे रुपांतर) (ग्रामविकास विभाग)
5. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, 2016 (मुंबई महानगर प्रदेशाव्यतिरिक्त अन्य महानगर प्रदेशामध्ये MMRDA च्या धर्तीवर विकास प्राधिकरण स्थापन करणे) (नगर विकास विभाग) (अध्यादेश क्र. 11/2016 चे रुपांतर) (न.वि.वि.)
6. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र महानगर पालिका (सुधारणा) विधेयक, 2016 (महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या नागरीकांनी त्यांचा प्रतिनिधी निवडून देण्याकरिता नवीन प्रभाग करण्याबाबत तरतुदी) (नगर विकास विभाग) (अध्यादेश क्र. 12/2016 चे रुपांतर) (न. वि.वि.)
7. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. . - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, 2016 (जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे नव्याने घटन करण्याबाबत तरतुदी) (जलसंपदा विभाग) (अध्यादेश क्र. 13/2016 चे रुपांतर) (जलसंपदा विभाग)
8. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. . .- महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2016 (अध्यादेश क्र. 14/2016 चे रुपांतर) (सन 2016-17 या शैक्षणिक वर्षाकरिता नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरु करण्याबाबत राज्य शासनाची मान्यता 15 जून 2016 ऐवजी 31 जुलै 2016 पर्यंत देता येईल याकरिता तरतुदी) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
9. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. . महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन
(विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2016 (अध्यादेश क्र. 15/2016 चे रुपांतर) (इ -पणन सुविधा उपलब्द्ध करुन देणे,फळे व भाजीपाल्याच्या व्यापाराचे उदारीकरण याबाबत तरतुदी, कृषी उत्पन्नावर एका ठिकाणीच फी बसविण्याची तरतूद करणे) (पणन विभाग)
10. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. . महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, 2016) ( आकारीपड जमीन मूळ मालकाला विवक्षित अटींवर व दंड भरल्यास परत करणे तसेच अपील व पुनरीक्षण याबाबत शासनास देय रकमेच्या 25 % रक्कम भरल्याशिवाय विचारात घेता येणार नाही याबाबत तरतुदी) (महसूल विभाग) (नवीन विधेयक)
(तीन) प्रलंबित विधेयके
(अ) विधान परिषदेत प्रलंबित
1. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र.3 .- महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2016 (सहकार विभाग़) (अध्यादेश क्र. 2/2016 चे रुपांतर) (रिझर्व्ह बॅंकेच्या मागणीनुसार किंवा सूचनांनुसार निष्प्रभावित केलेल्या विमा उतरवलेल्या सहकारी बॅंकेच्या बाबतीत समितीच्या सदस्यांना अनर्ह ठरविण्याची तरतूद करणे) (पुरःस्थापित दि. 10.03.2016) (विधान सभेत संमत दि. 15.03.2016) (विधान परिषदेत विचारार्थ दि. 16.03.2016) (प्रवर समितीचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर दि. 16.03.2016)
2. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. 4 . -महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) विधेयक, 2016 (अध्यादेश क्र. 1/2016 चे रुपांतर) (पणन विभाग) (बाजार समित्यांचे कार्य कार्यक्षमतेने व सुरळितपणे चालण्यासाठी अशा समित्यांवर तज्ञ व्यक्तीची नेमणूक करण्याकरिता तरतुदी करणे (पुरःस्थापित दि. 10.03.2016) (विधान सभेत संमत दि. 15.03.2016) (विधान परिषदेत विचारार्थ दि. 16.03.2016/ 12.04.2016)
3. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. 7 .- महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, 2016 (अध्यादेश क्र. 5/2016 चे रुपांतर)(कार्यलक्षी संचालकाच्या नियुक्तीबाबत तरतुदी, 25 पेक्षा जास्त नियमित कामगार पटावर असणा-या सहकारी संस्थेच्या समितीवर कामगार प्रतिनिधीची नियुक्ती, भाग भांडवलाच्या स्वरुपात शासनाचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थेच्या समितीवर शासनाच्या प्रतिनिधी व तज्ञ व्यक्तीची नियुक्ती याबाबत तरतुदी) (सहकार विभाग) (पुरःस्थापित दि. 14.03.2016) (विधान सभेत विचारार्थ दि. 06.04.2016- विधान सभेत संमत- विधान परिषदेत विचारार्थ दि. 12.04.2016)
(ब) विधान सभेत प्रलंबित
1. सन 2015 चे विधान सभा विधेयक क्र. 50.- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (चौथी सुधारणा) विधेयक, 2015 (अध्यादेश क्र.18/2015 चे रुपांतर) (नियोजन प्राधिकरणाने तयार केलेली विकास योजना सदोष असल्यास नियोजन प्राधिकरणाच्या स्तरावर त्या मसुद्यात दुरुस्ती करता यावी याकरिता राज्य शासनाला निदेश देण्याचा अधिकार प्रदान करणे) (नगर विकास विभाग) (पुरःस्थापित दि. 08.12.2015)
(क) संयुक्त समितीकडे प्रलंबित
1. सन 2016 चे विधान सभा विधेयक क्र. 16.- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक, 2015 (सार्वजनिक विद्यापीठांसंदर्भात नवीन अधिनियम) (उच्च व तंत्र शिक्षण) विभाग) (पुरःस्थापित दि. 05.04.2016) (विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याचा प्रस्ताव विधान सभेत संमत दि. 12.04.2016- प्रस्तावास विधान परिषदेची सहमती दि. 13.04.2016)
No comments:
Post a Comment