राज्यमंत्री मंडळात 10 नवीन चेहरे
राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती
राज्यपालांनी 6 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई, दि. 8 July 2016 : राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार विधानभवनातील परिषद सभागृहात एका छोटेखानी सोहळ्यात संपन्न झाला. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी 6 आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची तर 5 आमदारांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य, आमदार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांचे कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
विधानपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य पांडूरंग फुंडकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल,संभाजी पाटील-निंलगेकर, सुभाष देशमुख, महादेव जानकर या 6 आमदारांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अर्जुन खोतकर, रविंद्र चव्हाण, मदन येरावार, गुलाबराव पाटील आणि सदाशिव खोत या 5 आमदारांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना या विस्तारात बढती देण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment