मुंबई / प्रतिनिधी - खासगी बसगाडय़ा भाडय़ाने घेण्याच्या निषेधार्थ बेस्ट कर्मचारी संघटनेतर्फे उद्या, मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा आणि महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात हजारो बेस्ट कामगार सहभाग घेऊन आपला असंतोष व्यक्त करणार असल्याचे बेस्ट युनियन वर्कर्सचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
बेस्ट आर्थिक संकटात असूनही बेस्टने खासगी 100 बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचे जाहीर केले आहे. खासगी बसेसच्या माध्यमातून बेस्टचे खासगीकरण केले जाणार असल्याचा आरोप शशांक राव यांनी केला. तसेच या बसेसवर खासगी चालक नेमण्यात येणार असून खासगी बसेसचा प्रवासीकर मात्र बेस्ट भरणार असल्याने बेस्ट कर्मचारी मात्र उद्ध्वस्त होणार असल्याने कर्मचाऱयांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तसेच बेस्टमधील या खासगीकरणाविरोधात 8 जून रोजी वडाळा डेपो येथे निदर्शने करण्यात आली होती.

No comments:
Post a Comment