मुंबई / प्रतिनिधी - शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी गोरेगाव पूर्व येथील आरे परिसरातकेलेल्या अनधिकृत बांधकामा विरोधात सोमवार दि. २७ जून, २०१६ रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम लोकायुक्त कार्यालयात तक्रार करणार.
गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने असलेल्या निधीतून आरेमध्ये व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. आरे प्रशासनाने या व्यायमशाळेस रितसर परवानगी दिल्यानंतरच निर्धारित जागेत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून शासनाची रितसर परवानगी घेऊन ही व्यायामशाळा बांधण्यात आली, असे आहे तर रविंद्र वायकर यांनी संबंधित व्यायामशाळेत अतिरिक्त बांधकाम का करण्यात आले ? त्याची मंजुरी आहे का ? रविंद्र वायकरांकडे याची माहिती व पुरावे असल्यास त्यांनी ते जनतेला दाखवावेत, असे संजय निरुपम म्हणाले.
सदर व्यायामशाळेतील अतिरिक्त बांधकामाबाबत आरेने म्हाडाला वारंवार संबंधित बांधकाम व जागेवरील अतिक्रमण याबाबत पत्र व्यवहार केला तरी ही कारवाई झाली नाही. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर असल्यामुळे आणि संबंधित खाते वायकर यांच्याकडे असल्यामुळे आत्तापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. रवींद्र वायकर हे आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करीत आहेत, याकरिता त्यांच्या विरोधातलोकायुक्त कार्यालयात तक्रार करणार आहे, असे निरुपम म्हणाले.
No comments:
Post a Comment