मुंबई / प्रतिनिधी दि. ८ जून 2016
खासदार आणि सर्वच लोकप्रतिनिधींचा मानसन्मान राखला गेला पाहिजे, आणि ते काम रेल्वेच्या प्रशासनाने करणे अपेक्षितच होते. जर तसे झाले नसेल तर ती रेल्वे प्रशासनाची चूकच आहे. पण जनतेची विकासकामे होत असताना आपला वैयक्तिक मानसन्मान बाजूला ठेवून आजचा दुर्दैवी प्रकार टाळता आला आसता. कारण जनतेच्या सुविधेपेक्षा आमचा मानसन्मान मोठा नाही. अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
वांद्रे टर्मिनन्स येथे आज रेल्वेच्या होम फ्लॅटफॉर्म आणि बुकींग ऑफिस, कांदिवली स्थानका मध्ये एक्सिलेटर आणि बुकींग ऑफिस तसेच गोरेगांव येथे तीन एक्सिलेटर या कामाचे उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमंत्रण वेळीच मिळाले नाही. तरीही विकास कामांचा शुभारंभ असल्यामुळे आमदार अॅड आशिष शेलार या कार्यक्रमाला थोडे उशीरा पोहोचले, त्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, आजपर्यंत विकास कामे होत नाहीत म्हणून निदर्शने करताना पाहिले होते. पण विकासकामांची उद्घाटने प्रत्येक आठवड्याला होत असताना निदर्शने करतानाचे लोकप्रतिनिधी आज प्रत्यक्ष पाहता आले. मुंबईत ज्या पद्धतीने रेल्वेने विकास कामांचा धडाका सुरू केला आहे, हे जर असेच होणार असेल आणि जनतेला सुविधा मिळणार असतील तर अपमान झाला तरी चालेल. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी मानसन्मान बाजूला ठेवून अशा कार्यक्रमांना उपस्थित राहायला हवे, असे मला वाटते. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात त्यांनी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मग ते परेलचे टर्मिनन्स असो वा विविध ठिकाणी एक्सिलेटर, हर्बरचे बारा डबे, एसी लोकल, सीसीटीव्ही, महिलांच्या डब्यातील पॅनीक बटन, फ्लॅटफॉर्मची उंची वाढविणे व काही स्टेशन परिसराचा कायापालट असे अनेक निर्णय घेऊन रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न रेल्वेमंत्री वेगाने करीत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी अशी अनेक कामे सुरू असताना कुणालातरी पोटदुखी का व्हावी? उलट आपला वैयक्तिक मानसन्माम बाजूला ठेवून जनतेच्या सुविधांच्या कामात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق