गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वाएकर यांचा नवीन घोटाळा - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2016

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वाएकर यांचा नवीन घोटाळा - संजय निरुपम

अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला रवींद्र वायकर यांच्या भागीदारीत अनधिकृत ६ एसआरए प्रकल्प सुरू आहेत. त्याची किंमत सुमारे १००० कोटीं एवढी आहे - संजय निरुपम
मुंबई २८ जून २०१६ 
मागच्याच आठवड्यात शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा आरे परिसरातील व्यायामशाळेतील अनधिकृत बांधकाम घोटाळा बाहेर आला होता आणि आता रवींद्र वाएकर यांचा नवीन घोटाळा बाहेर आला आहे. 


अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्वेला रवींद्र वायकर यांच्या भागीदारीत अनधिकृत ६ एसआरए प्रकल्प सुरू आहेत. त्याची किंमत सुमारे १००० कोटीं एवढी आहे. ऐश्वर्या लाईट्स आणि ऐश्वर्या अवंत या वायकर यांच्या कंपनी आहेत. इन्कलाब नगरराजश्री निवास अंधेरी पूर्वशामनगरमहाकाली गुंफेजवळअंधेरी रामबागमध्ये २ प्रकल्प असे सहा अनधिकृत प्रकल्प वायकर यांचे भागीदारीत सुरू आहेत. यांची बाजारभाव किंमत सुमारे रुपये १००० कोटी एवढी आहे. आणि सुमारे साडे तीन लाख एवढे अनधिकृत बांधकाम झालेले आहे. हरमीत सिंग गुप्ता हा या कंपन्यांचा मूळ मालक असून वायकर भागीदार आहेत. हरमीत सिंग गुप्ताला पुढे करून वायकर सगळे प्रकल्प राबवित आहेत. म्हणून या सर्व प्रकल्पांना रवींद्र वायकर यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून जलदगतीने मंजुरी मिळवली आहेअशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते पुढे म्हणाले की या सर्व ६ एसआरए प्रकल्पांना वायकर मंत्री झाल्यावर जलदगतीने मंजुरी मिळाली. व्यवसाय करणे हा गुन्हा नाही मात्र तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहातत्या खात्याचा उपयोग करून मंत्री आपल्या कंपन्यांना फायदा करून घेत आहेत. आपल्या कंपन्यांच्या भागीदारीतील प्रकल्प मंजुरीसाठी रवींद्र वायकर शासकीय निवासस्थानी बैठक घेतात. हा सुद्धा एक गुन्हाच आहे. वायकर म्हणतात २०११ ला मी ऐश्वर्या लाईट्स कंपनीत राजीनामा दिला आहे मग २०१४ च्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात त्यांनी या कंपनीचा उल्लेख केलेला आहे. वायकर खोटे बोलत आहेत. ते हे सगळे लपवत आहेत. वायकर यांनी आपल्या एसआरए प्रकल्पांना 'ना विकास क्षेत्रातआणि 'प्रतिबंधित क्षेत्रातही परवानगी दिली आहे. या परवानग्या त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून अनधिकृतपणे मिळविलेल्या आहेत. 

संजय निरुपम म्हणाले की, मंत्री कायदेशीरपणे आपला एसआरए प्रकल्प असेल तर माझा आक्षेप नव्हता पण वायकर सगळे बेकायदेशीर करत आहेत. जोगेश्वरी गुंफा संरक्षित असून त्याच्या १०० मीटर परिसरात बांधकाम करू नये असा पुरातत्व विभागाचा नियम आहे. तसेच हायकोर्टाचे आदेश ही आहेत. तरी ही सगळे नियम धाब्यावर बसवून रवींद्र वायकर यांच्या भागीदारीतील एसआरए प्रकल्प तिथे सुरूच आहे. वायकर यांच्या प्रकल्पाला १०० मीटरच्या आत परवानगी दिली. वायकर यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून या परवानग्या मिळविल्या आहेत. आमची अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी आहे की, रवींद्र वायकर यांना ताबडतोब मंत्री पदावरून दूर करावे व सर्व एसआरए प्रकल्पांना स्थगिती द्यावी आणि या सर्व प्रकल्पाची सखोल चौकशी करावी.  आमची दुसरी मागणी आहे की एसआरएम्हाडा व मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे ज्यांनी रवींद्र वायकर यांच्या सांगण्यानुसार अनधिकृत कामे केलेली आहेत. त्यांना मदत केली ते अधिकारी ही दोषी आहेत. 

संजय निरुपम यांनी आवाहन केले आहे की, अंधेरी व जोगेश्वरी पूर्वेतील लोकांनी बाहेर पडून या सर्व प्रकल्पांबद्दल निषेध नोंदवावा. जाहीररीत्या आवाज उठवावा. आणि कोणीही या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू नये. भविष्यात हे प्रकल्प बंद पडतील आणि बांधकाम तोडले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad