मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधील रस्ते घोटाळ्यातील खाजगी लेखा परीक्षकांच्या कार्यालयातील १० लेखा परीक्षकाना अटक केल्या नंतर पोलिसांनी कंत्रादारांकडे काम करणाऱ्या ४ अभियंत्यांना अटक केली आहे. या ४ अभियंत्यांना कोर्टात हजार केले असता त्यांना २१ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबईमधील रस्त्याच्या बांधकामात अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या समितीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान पालिकेने थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून नेमलेल्या कंपन्यामधील १० लेखा परीक्षकांनी कामाची जागेवर जाऊन पाहणी ना करताच कामे झाल्याची खोटी प्रमाणपत्रे दिली आहे. अशी खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या १० खाजगी लेखा परीक्षकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टाने २१ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लेखा परीक्षकांना अटक केल्यावर लेखा परीक्षक कंपन्यांचे मालक आणि रस्त्याचे काम मिळवणारे कंत्राटदार यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच पोलिसांनी कंत्राटदारकडे काम करणाऱ्या ४ अभियंत्यांना अटक केली आहे. रस्त्याचे कंत्राट मिळवलेल्या जे. कुमार कंपनीमधील संजय सिंग (३७), रेलकॉन आर.के.मदानी कंपनीच्या सुनील चव्हाण (२८), आरपीएस के.आर.कन्स्ट्रक्शनच्या संदीप जाधव, आणि आर.के. मदानीच्या सांथनवेल वेलमणी (२३) या चार अभियंत्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या ४ अभियंत्यांना कोर्टात हजार केले असता त्यांना २१ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment