एकनाथ खडसे यांना अटक करून जेल मध्ये टाका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 يونيو 2016

एकनाथ खडसे यांना अटक करून जेल मध्ये टाका

'मोकोका' कायद्या अंतर्गत कारवाई करा - संजय निरुपम 
मुंबई / प्रतिनिधी
एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी कॉंग्रेसतर्फे प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर निदर्शने करण्यात आली. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मालाड पश्चिम आणि बोरीवली पश्चिम येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी संजय निरुपम म्हणाले कि एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेऊन फक्त चालणार नाही त्यांना अटक करून जेल मध्ये टाका. जो पर्यंत त्यांना अटक होत नाही तो पर्यंत कॉंग्रेसतर्फे हे आंदोलन सुरूच राहणार आहे असे निरुपम यांनी सांगितले. 

रोज कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. एवढे करून हि एकनाथ खडसे यांना अटक झाली नाही तर मी स्वतः कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर घुसणार आहे. मुख्यमंत्र्यांना जागे करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदि म्हणतात भाजप सरकार वर कोणताच डाग नाही आहे. भ्रष्टाचार मुक्त आमचे सरकार आहे. त्यांच्या सरकार मधलाच एकनाथ खडसे सगळ्यात मोठा डाग आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणूनच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना सरकारमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, दीपक सावंत, रणजीत पाटील, बबनराव लोणीकर आणि चंद्रशेखर बावनखुले असे ७ मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. 

ते पुढे म्हणाले कि एकनाथ खडसे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तसेच कुख्यात गुंड दाउद याच्याशी यांचे संबंध आहेत. खडसे दाउदशी फोनवर संपर्क साधतात. त्यांना 'मोकोका' कायद्या अंतर्गत अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जो पर्यंत एकनाथ खडसे यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करून जेलमध्ये टाकत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. संजय निरुपम यांच्या सोबत मालाड पश्चिम येथील आंदोलनात आमदार असलम शेख आणि बोरीवली पश्चिम येथील आंदोलनात मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर तसेच अनेक कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad