मुंबई, दि. 3 : मुंबईमध्ये वर्षभर कुठला ना कुठला उत्सव सुरु असतो, मात्र ' मुंबईकर फेस्टिव्हल' हा मुंबईचा स्वतःचा फेस्टिव्हल व्हावा. या फेस्टिव्हलसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या.
मुंबई फेस्टिव्हलच्या वतीने आज पद्म पुरस्काराने सन्मानित 'स्वाभिमानी मुंबईकरांचा' सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, आमदार आशिष शेलार, आयोजक तरुण राठी आदी उपस्थित होते. मुंबईकरांसाठी खास आपला स्वत:चा फेस्टिवल डिसेंबर महिन्यात आयोजित करण्याची संकल्पना स्वागतार्ह असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, 15 ते 18डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विविध क्षेत्रांमध्ये देशाला समृद्ध करणाऱ्या पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पद्मभूषण उदित नारायण आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार करण्यात आला. स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांच्या वतीने सुब्रतो रथो यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच रामनुजा तत्ताचार्य, उदित नारायण, हाफिज कॉन्ट्रॅक्टर,सुधाकर ओळवे, मोहम्मद इम्तियाज कुरेशी, केतकी होरमुसजी घरडा, अजय देवगण, मधुर भांडारकर, पियुष पांडे, उज्ज्वल निकम, डॉ. गणपती यादव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुंबईकर फेस्टिवलच्या लोगोचे अनावरणही यावेळी करण्यात आले
No comments:
Post a Comment