जुहू गल्ली आगीच्या दुर्घटनेची चौकशी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2016

जुहू गल्ली आगीच्या दुर्घटनेची चौकशी होणार

मुंबई - प्रतिनिधी 30 june 2016
जुहू गल्ली येथील मेडिकल स्टोर्समधील आगीच्या दुर्घटनेत 9 जण मृत पावले. या दुर्घटनेची अग्निशमन दलामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदले यांनी दिली. आगीच्या घटनास्थली पोहचन्यासाठी अरुंद रस्ता, पार्किंग यामुळे थोडाफार उशीर झाला, असे राहांदले यांनी सांगितले.


असे असून ही अग्निशमन दलाने पार्किंग वाहनांची पर्वा न करता अग्निशमन दलाचे वाहन रेटत पुढे नेले. त्यामुळे आमच्या वाहनाचे आणि पार्किंग केलेल्या वाहनाचे नुकसान झाले. परंतु त्यास आमचा नाईलाज होता. बचावकार्य करणे त्वरित महत्वाचे होते. अग्निशमन दलाच्या जवानानी शिडीचा वापर करून सिमेंटचे पत्रे फोडून व 3 फायर इंजिन आणि एक जम्बो टैंकरच्या सहाय्याने बचावकार्य केले, असे राहांदले यांनी सांगितले. जखमीना पोलिस वाहनाने आणि अग्निशमन दलाच्या रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले. दुर्दवाने कोणी वाचू शकले नाही. विशेष म्हणजे, वरच्या मजल्यावर जाणारी शिडी व जागा खुप छोटी होती. आगीची दहकता वाढली आणि त्यात काळ्या धुरामुळे घरातील लोक अडकून पडले व त्यात त्यांचा दुर्दैवी मुर्त्यु झाला, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad