घोटाले भ्रष्टाचार आणि लोंढ्यामुले पालिकेची आरोग्य समितीची बैठक गाजली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2016

घोटाले भ्रष्टाचार आणि लोंढ्यामुले पालिकेची आरोग्य समितीची बैठक गाजली

मुंबई / प्रतिनिधी 14 June 216
मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात होत असलेले घोटाले, भ्रष्टाचाराचा मुद्दा आरोग्य समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला आहे. त्याच बरोबर मुंबई बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुले रुग्णालयावर ताण पडत असल्याने त्यांच्याकडून अतिरिक्त शुक्ल वसूल करावे अशी मागणी आरोग्य समिती सद्स्यानी केली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात होत असलेले घोटाले खुद्द सत्ताधारी शिवसेनेच्या सद्स्यानी चव्हाट्यावर आणले आहे.


शिवसेनेच्या आरोग्य समितीच्या सदस्या शितल म्हात्रे यांनी डॉक्टरांच्या बदली प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. कनिष्ठ डॉक्टरांची बदली पालिकेच्या दवाखान्यात केली जात नाही. असे असतानाही पालिकेच्या आरोग्य खात्यातील मिंडे यांनी नियम धाब्यावर बसवत सर्रासपणे कनिष्ठ डॉक्टरांची बदली पालिकेच्या दवाखान्यात करत आहे. कनिष्ठ डॉक्टरांना रुग्णालयात काम करणे गरजेचे आहे मात्र त्यांची दवाखान्यात बदली केली जात असल्याने रुग्णाना त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्यात फ़क्त वरिष्ठ डॉक्टरांचीच नियुक्ती केली जाते त्यामुले याप्रकारणाची चौकशी करण्याची मागणी शितल म्हात्रे यांनी केली.
रुग्णालयाच्या फर्नीचरमधे मोठ्या प्रमाणात अफरातफरी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कोंग्रेसचे आरोग्य समिती सदस्य नंदकुमार वैती यांनी केला. पालिका रुग्णालयासाठी जे फ़र्निचर मागवले जाते ते फ़र्निचर न येता त्या ऐवजी भलतेच फ़र्निचर रुग्णालयात येते या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वैती यांनी केली. याच बरोबर वर्षानुवर्षे खरेदी विभागात एकच अधिकारी कसा कार्यरत आहे असाही प्रश्न इतर सदस्यानी उपस्थित केला.

मुंबई बाहेरील लोंढ्यामुले पालिका रुग्णालयावर ताण पडत असतो यामुले मुंबईबाहेरील लोंढ्यावरती अंकुश ठेवण्यासाठी अधिक शुल्क लावावे अशी मागणी तत्कालीन नगरसेवक मंगेश सातमकर यांनी 2007 मधे केली होती. यावर चर्चा करताना नागरिकाना रुग्णालयात सोयी सुविधा मिळत नसल्याने लोक नगरसेवक व आरोग्य समिती सदस्यांना दोष देतात. मुंबई बाहेरील लोकांमुले करदात्या नागरीकाना त्रास होत असल्याने त्यांच्यावर अधिक शुल्क लावावे अशी मागणी मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांनीही केली.

दरम्यान फ़र्निचर आणि बदली प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिले असले तरीही मुंबई बाहेरील रुग्णाकडून अधिक शुल्क लावण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने नकारात्मक भूमिका घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad