ब्रिकईगल आणि शेल्ट्रेक्स करणार कर्जत मधील वनांचे पुनर्ज्जीवन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2016

ब्रिकईगल आणि शेल्ट्रेक्स करणार कर्जत मधील वनांचे पुनर्ज्जीवन

मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या दुष्काळ पडला असून अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. झाडांची संख्या कमी असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचे प्रमाणही कमी आहे. मुंबईच्या आसपासची हिरवळही हरवत चालली असल्याने हिरवळ पुन्हा प्रस्तापित करण्यासाठी ब्रिकईगल सोशल हाउसिंग फौंडेशन आणि शेल्ट्रेक्स डेव्हलपर्स यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई जवळील कर्जत कसारा या भागात १० लाख बियाणांचे (सीड बॉल) वितरण करण्यात आले असून ५ जून या पर्यावरण दिनी या बियाणांचे रोपण करून विभागात हिरवळ निर्माण केली जाणार आहे अशी माहिती ब्रिकईगलच्या संस्थापिका कीर्ती तिम्मगौडार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.   

या उपक्रमाचा भाग म्हणून शाळा, बिगर सरकारी संस्था, स्थानिक सरकारी संस्था, सोसायट्या यांच्याशी संपर्क करून बियाणे (सीड बॉल) उपलब्ध करून दिले जात आहेत. हि बियाणे स्थानिक जैव विविधतेनुसार तयार करण्यात असून यामध्ये कर्जत आणि कसारा विभागातील भौगोलिक परिस्थितीनुसार वनस्पती असणार असल्याचे तिम्मगौडार यांनी सांगितले. या आधी कर्नाटक आणि गोवा येथे असाच प्रयोग करण्यात आला असून २० टक्के यश प्राप्त झाले आहे. १० लाख बियाणापैकी २० लाख बियाणांपासून २ लाख मोठी झाडे लागू शकणार असल्याने एक छोटे वन निर्माण होऊ शकते असे क्रिश मुरली ईश्वर यांनी सांगितले. शेल्ट्रेक्स प्रोजेक्ट्स या विभागात लवकरच एक हजार घरांचा ताबा आपल्या ग्राहकांना देणार आहे, घराचा ताबा देताना ग्राहकांना १० लाख बियाणे देवून त्याचे रोपण करून विभागात हिरवळ निर्माण करण्याचा मानस असल्याचे संदिप सिंग गौर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad