मुंबई / प्रतिनिधी 24 June 2016
मुंबई महानगरपालिका शाळामधील पटसंख्या कमी होत चालली आहे. पटसंख्या वाढवण्याबाबत पालिका सभागृहात चर्चा सुरु असताना खुद्द नगरसेवाकांची मुले पालिका शाळामधे जात नसल्याचे उजेडात आले आहे.
पालिका सभागृहात विरोधी पक्ष नेते प्रवीण छेड़ा यांनी निवेदन सादर करत पाहिले ते चौथी इयत्तेत प्रवेश मिळत नसल्याने या वर्गामधे 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्याना प्रवेश देण्याची परवानगी द्यावी असा मुद्दा उपस्थित केला.जेणे करून प्रत्तेकाला प्रवेश मिळेल असे त्यांनी म्हटले. मात्र छेड़ा यांचा मुद्दा इंग्रजी शाळाना प्रोत्साहन देण्याचा असल्याचे भाजपाने म्हटले. तर महापालिकेकडून इयत्ता 4 पर्यंत अनुदान दिले जाते पण शालामधे प्रवेश मिळण्यासाठी नगरसेवकांच्या पत्रानाही विचारात घेतले जात नाहित. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा या केवळ एका ठराविक समाजातील गटाना प्रवेश देते. त्यानंतर शिल्लक असलेल्या जागावर इतरांचा विचार केला जातो. यावर नगरसेवकानी आक्षेप घेतला.
दरम्यान महापालिका शाळेचा प्रश्न मांडताना येथे बसलेल्या 227 नव्हे तर 232 नगरसेवकांपैकी कोणाची मुले वा मुली पालिकेच्या शाळेत जातात, त्यांनी हात वर करा, असे शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटले असता कोणत्या ही नगरसेवकाने हात वर केला नाही.
नगरसेविका पेडणेकर म्हणाल्या की, आज काम करणारी महिला देखील स्वताच्या मुलांना माहापालिकेच्या मराठी शाळे ऐवजी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत दाखल करने पसंद करतात. कारण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे.पालिका शालेत 5 वी पासून इंग्रजी शिकवले जाते. त्यामुले प्रत्तेक जण आपल्या मुलाला पहिली पासून इंग्रजी माध्यमाच्या शालेत पाठवतो. त्यामुले पालिकेच्या शालेतही पहिली पासून मराठी सोबत इंग्रजी शिकवले जावे अशी मागणी पेड़णेकर यांनी केली.
दरम्यान पालिका शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे, पट संख्या वाढली पाहिजे त्यासाठी मराठी मुलांना पालिका शाळेत आणण्यासाठी सर्वोतोपरी पर्यन्त केले पाहिजे, असे प्रत्येक वेळी बोंबलणारे नगरसेवक, नगरसेविका प्रत्यक्ष स्वताच्या मुला वा मुलींना शाळेत दाखल करत नाही.
No comments:
Post a Comment