राज्य कामगार विमा योजनेसाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहाय्य- केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2016

राज्य कामगार विमा योजनेसाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहाय्य- केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय

मुंबई, दि. १४ : केंद्र शासनाच्या राज्य कामगार विमा महामंडळामार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात कामगारांच्या आरोग्य रक्षणासाठी अधिक दवाखाने सुरू करण्यात येतील, असे केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्य कामगार विमा योजनेतून चालविल्या जाणाऱ्या दवाखान्यांच्या सद्यस्थिती आणि विकासाबाबत बैठक झाली, त्यावेळी मंत्री बंडारु दत्तात्रय बोलत होते. 

दवाखान्यांसाठी जागा उपलब्ध करुन देऊ - मुख्यमंत्री
महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात ही योजना राबविली जाते. उर्वरीत भागातही या योजनेतून दवाखाने, रुग्णालये सुरू करण्यात यावीत. राज्य शासन त्यासाठी जागा ऊपलब्ध करून देईल, असे याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय म्हणाले की, केंद्र शासनाच्या राज्य कामगार विमा महामंडळामार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून देऊ. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात अधिक दवाखाने सूरू करण्यात येतील. राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या दवाखान्यांमधील आरोग्यविषयक सोयी सुविधा अधिक सक्षमपणे कामगारांपर्यंत पोहोचविण्याकरीता महाराष्ट्राने मागणी केल्याप्रमाणे साधारण 750 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या महामंडळामार्फत कामगारांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात राज्य कामगार विमा योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad