सबवे पादचाऱ्यासाठी मोकळा होणार
मुंबई / प्रतिनिधी 30 june 2016
मुंबईच्या रहदारीचे स्टेशन असलेल्या चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या सबवेवर फेरीवाल्यानी कब्जा केला आहे. फेरीवाल्यामुले पादचारी आणि प्रवासी यामुले त्रस्त झाले असल्याने पालिकेने हे दोन्ही सबवे खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही सबवे मधील दूकान चालकाना नोटिस दिल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहिती नुसार सीएसटी मधील 50 आणि चर्चगेट येथील 20 दुकान चालकाना तीन दिवसा पूर्वी नोटिस देण्यात आली आहे. या दूकान चालकाना एक महिन्यात दुकाने खाली करायची आहेत. पालिकेने सबवे मधील दुकाने भाड्याने दिली होती. यासाठी पालिका 10 ते 15 हजार रुपये भाड़े घेत होते. परंतू सबवे मधील दूकान चालकानी ही दुकाने दुसर्याच व्यक्तीला भाड्याने देवून लाखो रुपये भाड़े घेत होते. तसेच दुकाना समोर फेरीवाल्यांना जागा भाड्याने दिली जात होती. त्यासाठी फेरीवाल्यांकडून दिवसाला हजार ते दोन हजार रुपये भाड़े दुकानदार वसूल करत होते. सबवे मधे फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने पादचारी आणि रेलवे प्रवाश्याना याचा रोज त्रास होत होता. याची दखल घेत स्थानिक नगरसेवक गणेश सानप यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुले पालिकेनेही दोन्ही सबवे खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेला सबवे खाली केल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी पालिकेने सबवे मधे जाहिराती लावाव्या असा सल्ला दिला आहे. जाहिराती मधून पालिकेला आता पेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते असे सानप यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment