मुंबई : पावसाळा तोंडावर असताना नालेसफाईसाठी दिलेली डेडलाईन संपली तरी मानखुर्द, गोवंडी आणि शिवाजी नगर परिसरात अनेक ठिकाणी पालिकेने नालेसफाईला सुरुवात देखील केलेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी मनसेने एम पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या वेळी काही कार्यकर्त्यांनी थेट गटारातील कचराच पालिकेच्या कार्यालयामध्ये फेकून दिला.
मानखुर्द, गोवंडी आणि शिवाजी नगर हा मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. त्यामुळे पालिका या विभागाकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. या परिसरातून अनेक नाले वाहत आहेत. मात्र पालिकेने अद्यापही येथील अनेक नाल्यांची सफाईच केलेली नाही, असा आरोप करत आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी काही कार्यकर्त्यांनी नाल्यातून आणलेली घाण अधिकाऱ्यांसमोर टाकत निषेध केला.
No comments:
Post a Comment