मुंबई, दि. 13 : महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 2016, राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार 2016, विशेष नैपुण्य पुरस्कार 2016 या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे पुरस्कार कला, सांस्कृतिक व खेळ या क्षेत्रामध्ये अद्वितीय क्षमता व कुशलता दाखविलेल्या 6 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना देण्यात येतात. त्याकरीता अर्ज पालकांकडून सादर करण्यासाठी संबंधिची तपशीलवार माहिती व अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत क्र.2, पहिला मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-71 दूरध्वनी 25232308 या ठिकाणी किंवा केंद्र शासनाचे संकेत स्थळ www.wcd.nic.in येथे संपर्क साधावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2016 पर्यंत आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई उपनगर, मुंबई यांनी कळविले आहे.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق