मुंबई / प्रतिनिधी
दादर स्टेशन ला चैत्यभूमी नाव देण्यात यावे या मागणीसाठी ३ जून रोजी दु.२ वा आझाद मैदान, मुंबई येथे एकदिवसाचे धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आर के) वतीने करण्यात येणार आहे.
पक्षाचे अध्यक्ष राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली सदर धरणे आंदोलन होणार असून राष्ट्रीय स्मारकास साजेसे चैत्यभूमी जवळ समुद्रात १० एकर जागेवर धक्का बांधण्यात यावा,दादर रेल्वे स्टेशन पूर्व पश्चिम येथे सारनाथ द्वार कमान प्रतिकृती झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी रिपाई आर के गटा तर्फे आझाद मैदान येथे एकदिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद जाधव,अशोक देवधेकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment