मुंबई : गेल्या ४८ तासांपासून मुंबई आणि उपनगराला चिंब करणाऱ्या पावसाने रविवारीही आपला मुक्काम कायम ठेवला. शहर व उपनगरात ठिकठिकाणी पडझडीच्या १५ घटना घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही.
महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात २, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १७ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर शहरात ४, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडल्याच्या घटना घडल्या.
७८ झाडे पडली; दरडही कोसळली
भोईवाडा येथे दरड कोसळली असून सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. शहरात १, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर मुंबई शहरात १२, पूर्व उपनगरात २३ आणि पश्चिम उपनगरात ४३ अशी एकूण ७८ झाडे पडल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment