मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाला उच्च प्रतीचे अध्ययन आणि अध्यापन संसाधन उपलब्ध करुन देणे तसेच शिक्षकांमध्ये स्वयंअध्ययन पध्दती रुजविणे हे विद्या परिषद शिक्षक पोर्टलचे उद्दिष्ट आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करुन देण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले. तावडे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) च्या शिक्षक पोर्टलचे प्रकाशन करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ७ लाख शिक्षकांना अध्ययनाचा लाभ मिळणार आहे.
तावडे म्हणाले की, पोर्टलमध्ये सुरुवातीला ऑनलाईन, तसेच डाऊनलोड करता येतील या स्वरुपातील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेस उपयुक्त अशा गोष्टी व्हिडिओ, ऑडिओ, ई-बुक्स आणि वर्कशीट्स स्वरुपात उपलब्ध आहे. जेणेकरुन शिक्षक त्यांच्या सोयीनुसार ते डाऊनलोड करु शकतील. या ठिकाणी शिक्षक स्वयंअध्ययन करु शकेल, असे काही ऑनलाईन व्हिडीओ व ऑनलाईन प्रशिक्षण संच असणार आहेत. यामुळे शिक्षकांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल. दर सहा महिन्यांनी व्हिडीओ अद्ययावत करण्यात येईल. हे पोर्टल द्विभाषिक म्हणजेच मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार आहेत. जे सर्व प्रकारच्या स्मार्ट फोन आणि टॅबवर उपलब्ध असेल.
राज्यातील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम २२ जून २०१५ पासून सुरु करण्यात आला आहे. या शासन निर्णयात अपेक्षित बदलांसाठी शिक्षकांना प्राथमिक दुवा मानण्यात आले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयातील महत्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या विषयात त्यांच्या कौशल्यांचा विकास करणे गरजेचे वाटू लागले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमानुसार शिक्षक प्रशिक्षण हे आता अनिवार्य नसून शिक्षकांच्या मागणीनुसार शिक्षक प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात
No comments:
Post a Comment