बृहन्मुंबई उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांचे आवाहन
मुंबई, दि. 14 : शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांच्या कार्य कक्षेतील अनधिकृतरित्या सुरु असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी किंवा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांवर राहील, असे शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी कळविले आहे.
या अनधिकृत शाळांमध्ये शिवनेर विद्यामंदिर, इंग्रजी,साकीनाका, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 5वी ते 10वी, सेंट मेरी मलंकारा स्कूल, मोहिली व्हिलेज, साकीनाका, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 5वी ते 10वी, नंदछाया विद्यामंदिर, साकीनाका,माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 5 वी ते 10 वी, ज्ञानसंपदा इंग्लिश हायस्कूल, शिवाजीनगर, गोवंडी, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 8 वी ते 10 वी, श्री साई विद्यालय, मानखुर्द, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 8 वी ते 10 वी, ऑल सेंट इंग्लिश हायस्कूल, शिवाजीनगर,गोवंडी, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 8 वी ते 10 वी, अंजुमन इकरा उर्दू हायस्कूल, मानखुर्द, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 8 वी ते 10 वी,शिवाजीराव शेडगे विद्यालय, मानखुर्द, माध्यम-इंग्रजी, वर्ग-इ. 8 वी ते 10 वी या शाळांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment