मुंबई, दि. 23 : जिल्हा जात पडताळणी समिती स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला असून या समितीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची पदे कायम ठेवावीत असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे सांगितले.
याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव ज्ञानेश्वर सूळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपआयुक्त अरविंद वळवी यांच्यासह राज्यातील विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे जनसंपर्क अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
कांबळे म्हणाले की, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी नवीन पदांना मंजूरी दिली असून त्यात जनसंपर्क अधिकारी यांच्या पदांचा समावेश केला नाही. ज्याप्रमाणे विधी अधिकारी यांची कंत्राटी पदे या समितीत कायम ठेवली आहेत. त्याप्रमाणे जनसंपर्क अधिकाऱ्यांची पदेही कायम ठेवावीत असे सांगून कांबळे म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण आयुक्त, पुणे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी तयार करुन संबंधित विभागाकडे पाठवावा आणि त्यावर नियमानुसार कार्यवाही करावी असेही कांबळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment