मुंबई, दि. 26 : हरित महाराष्ट्राच्या उभारणीसाठी १ जुलै रोजी असलेला कृषी दिन आणि वन महोत्सवाच्या सप्ताहानिमित्त दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा आणि त्याचे जतन व संवर्धन करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर हौशी सायकलिंग असोसिएशन दादर, मुंबई यांच्या सहकार्याने आज एअर इंडिया इमारत, नरिमन पॅाईंट ते पारसी जिमखाना (व्हाया सुखसागर सिग्नल) अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी या रॅलीचे उद्घाटन हिरवा झेंडा
दाखवून केले.
याप्रसंगी मुंबई शहर जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी, विभागीय वन अधिकारी संजय माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी (प्रभारी) सुभाष नावरे, उपसंचालक (क्रीडा) आनंद वेंकटेश्वर, मुंबई शहर व मुंबई उपनगर हौशी सायकलिंग असोसिएशनचे कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment