शेतकरी कृती समितीचे आझाद मैदानात उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 June 2016

शेतकरी कृती समितीचे आझाद मैदानात उपोषण

मुंबई / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, आअदिवसि व्हीजेएनटी ओबीसी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरित सोडवाव्यात यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात १ जून पासून अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी कृती समितीच्या वतीने आकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु केले आहे. 

शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी रोजगार हमी योजनेतून प्रती हेक्टरी दोन मजूरांची सहा महिन्यांसाठी मजुरी देण्यात यावी, कोरडवाहू शेतकऱ्यांना ३ ते ५ वर्षे मोफत खात व बी बियाणे उपलब्ध करून द्यावे, कोरडवाहू शेतकरी हे आदिवासी बंजारा दलित ओबीसी समाजातील असल्याने आदिवासी आश्रमशाळा बंद न करता चालू ठेवाव्यात, नामांकित आश्रमशाळांची परिभाषा निशिचीत करावी, नामांकित शाळांसाठी प्रती विद्यार्थी ५० हजार वार्षिक परिरक्षण अनुदान देण्यात येते त्याच्या अर्धे अनुदान अनुदानित आश्रमशाळांना अनुदान द्यावे, वसंतराव नाईक वसतिगृह व महात्मा फुले वसतिगृह जिल्हा व तालुका ठिकाणी उभारण्यात येवून मागासवर्गीय गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी कृती समिती द्वारे उपोषण करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad