व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तीन संस्थांच्या नावात बदल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2016

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तीन संस्थांच्या नावात बदल

मुंबई दि 18 : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेला अनुसरुन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तीन संस्थांच्या नावात बदल केला आहे. या संस्थांच्या नावात बदल येत्या शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून होणार आहे. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मान्यता दिल्यानुसार खालील तीन संस्थांच्या नावात बदल करण्यात आला आहे.


श्री सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे सच्चिदानंद इन्स्टिटयूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी, कोराडी (नागपूर) या संस्थेचे नाव बदलून आता ही संस्था तायवडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी असे झाले आहे. बॅकवर्ड क्लास युथ रिलिफ कमिटी यांचे नागपूर पॉलीटेक्निकनागपूर या संस्थेचे नाव बदलून आता बॅकवर्ड क्लास युथ रिलीफ कमिटी यांचे केडीके नागपूर पॉलीटेक्नीकअसे, तर बॅकवर्ड क्लास युथ रिलीफ कमिटी यांचे उमरेड पॉलिटेक्निकनागपूर या संस्थेचे नाव बदलून आता बॅकवर्ड क्लास युथ रिलीफ कमिटी यांचे केडीके पॉलीटेक्निक असे असेल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201606171705198608 असा आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad