मुंबई, दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 55 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील व 13 व्या बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेते कलाकार, तंत्रज्ञ व संस्था यांचा नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिरांत आयोजिलेल्या समारंभात सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ कलावंत रवींद्र बेर्डे, वामन तावडे, प्रणवराव राणे, कृष्णा वारेकर, शीतल तळपदे, विजय कदम, मनोज कदम, अजित भगत, बाबा पार्सेकर, राहूल भंडारे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कलावंतांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील उपस्थित होते.
यावर्षी कोकण विभागातून हौशी मराठी नाट्यस्पर्धेत 125 संस्थांनी तर बालनाट्य स्पर्धेत 41 संस्थांनी नाटके सादर केली. कोकण विभागात मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि गोवा या स्पर्धा केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील पात्र कलाकारांना नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मीच्या हस्ते प्रमाणपत्र, रौप्यपदक व धनादेश देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन रौप्यपदके आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेही यावेळी वितरीत करण्यात आली.
No comments:
Post a Comment