मुंबई - २८ जून २०१६ - महाराष्ट्र विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे सदस्यत्व ७ जुलैला संपत असल्याने आणि उपसभापती वसंत डावखरे यांचे सदस्यत्व ८ जूनला संपल्याने सभापती आणि उपसभापती यांच्या निवडणुकीसाठी ८ जुलैला एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्यासाठी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिपरिषदेत घेण्यात आला.
राज्याचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून तत्पूर्वीच सभापती आणि उपसभापतींची पदे रिक्त होत आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी सभापतींची निवड करणे आवश्यक होते. त्यामुळे मा. राज्यपालांच्या मान्यतेने ८ जुलैला एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करून त्याच दिवसाच्या बैठकीच्या समाप्तीनंतर ते संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात नवीन सदस्यांचा शपथविधीही होणार आहे.
No comments:
Post a Comment