मुंबई / प्रतिनिधी - काँग्रेस तळागाळात रुजावी म्हणून मुंबई काँग्रेसने मुंबईतील २१३ वॉर्डांमध्ये ब्लॉक अध्यक्ष व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्ती पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम सोमवार, २० जून २०१६ रोजी दुपारी २ वाजता मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात ठेवण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलेले आहे.
काँग्रेसमध्ये या आधी वॉर्ड अध्यक्षांना मान्यता नव्हती, परंतु संजय निरुपम यांनी पुढाकार घेऊन मुंबई काँग्रेसतर्फे ठराव करून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवून त्यांची मान्यता मिळवली. वॉर्डनिहाय ब्लॉकची रचना केली. ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी मार्फत काँग्रेस घराघरात पोहचावी तसेच सर्व सामान्य जनतेची समाजोपयोगी व लोकहितार्थ कामे लवकरात लवकर पार पाडावीत, हा या मागचा उद्देश आहे. सोमवारच्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच पुढच्या महिन्यात त्यांच्यासाठी एक भव्य मार्गदर्शन शिबीर ही आयोजित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment