मुंबई / प्रतिनिधी - आप्तकालीन व्यवस्थेसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असताना मुंबईची लाइफ लाइन असलेली बेस्टची मात्र कोणतीच तयारी झाली नसल्याचे आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत उजेडात आले आहे. त्यामुळे येणार्या पावसाच्या दिवसात मुंबईकर नागरीक आणि बेस्टच्या ग्राहकांना मोठ्या फटका बसण्याची चिन्ह आहेत.
बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केलेल्या हरकरतीच्या मुद्दाव्दारे बेस्ट आप्तकालीन व्यवस् थापनासाठी सज्ज नसल्याचे निदर्शनास आणले. पावसाळा तोंडावर आला असताना पंधरा दिवस आधीच सर्व यंत्रणा सज्ज झाली असताना बेस्टने मात्र कोणतीच काळजी घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बेस्टचे आजच्या दिवसात 1100 कर्मचारी निवृत्त झाले असताना या रिक्त जागांवरती नवीन कर्मचार्यांची भरती करण्यात आलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात बेस्टकडून 400 ते 500 कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येते. मात्र यावर्षी अशी कुठलीही भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्ट पावसाळ्यात, फ्युज उडणे, वीज जाणे किंवा शॉर्टसर्कीटचे प्रकारांना कसे सामोरे जाणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सदस्य सुहास सामंत यांनी पावसाळी दिवसात करण्यात येणार्या दुरुस्तीच्या कामांसाठी वापरण्यात येणार्या वाहनांवर चक्क 10 वाहन चालकांची कमतरता असल्याने एखाद्या आप्तकालीन ठिकाणी पोहचणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला. बेस्ट समि तीचे माजी अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनीही बेस्ट प्रशासनाचा कारभारावर नाराजी व्यक्त केली.
याबाबत प्रशासनाची भूमिका मांडताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी बेस्टचे कान उपटले. आप्तकालीन व्यवस्थापनासाठी बेस्टने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेत कम्युनिकेशन प्लॅनचा उल्लेख नसल्याने आर्श्चय व्यक्त केले. आप्तकालीन परिस्थितीत कोणता अधिकारी कोणाशी संपर्क करेल, याची नोंदच करण्यात आलेली नाही. अनेक अधिकार्यांचे दुरध्वनी क्रमांक असले तरी त्यामध्ये भ्रमणध्वनीचा उल्लेखच करण्यात न आल्याने आप्तकालीन परिस्थितीत तातडीने संपर्क कसा करायचा, याकडेही त्यांनी बेस्ट अधिकार्यांचे लक्ष वेधले. आप्तकालीन परिस्थितीत गर्दीच्या रेल्वे स्थानकाजवळ कशा प्रकारची बेस्ट बसची व्यवस्था असावी, याचा विचार करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला. चर्चे अखेर बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांनी आप्तकालीन व्यवस्थापनास कसे सामोरे जाणार तसेच आप्तकालीन व्यवस्थापन पुस्तिकेमधील चुकांमध्ये सुधारणा करुन पुढील बैठकीत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
No comments:
Post a Comment