पैशाच्या पाठीमागे धावायला लावणारी प्रवृत्तीच दुष्काळास कारणीभूत – कॉम. कुमार शिराळकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2016

पैशाच्या पाठीमागे धावायला लावणारी प्रवृत्तीच दुष्काळास कारणीभूत – कॉम. कुमार शिराळकर

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – सिटू भवन येथे सुरू असलेल्या एसएफआय च्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिराचा आजचा दूसरा दिवस. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत व अभ्यासक कॉम. कुमार शिराळकर यांनी ‘दुष्काळ मानवनिर्मित की निसर्गनिर्मित’ या विषयावर मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील सद्य दुष्काळी परिस्थितीवर बोलत असतांना कॉम. कुमार शिराळकर म्हणाले, ‘ दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत आहे. भांडवलदारीने पैशाच्या पाठीमागे धावायला लावणारी एक प्रवृत्ती निर्माण केली आहे. तीच सध्याच्या दुष्काळाला करणीभूत आहे.’ प्रचंड नफा कमावण्याच्या पाठीमागे लागून निसर्गाचे अमाप शोषण भांडवलदार करत आहे. दुष्काळी परिस्थितीचा फायदा टँकर लॉबी, वाळू माफिया आणि बाटलीबंद पाणी विकणार्‍या टोळ्या मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. परंतु दूसरीकडे मात्र ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनता तहानेने व्याकुल होऊन पाण्याच्या शोधात पायपीट करत आहे. या सर्व भीषण परिस्थितीत सरकार मात्र मलम पट्टी करण्याचे काम करत आहे. दीर्घकालीन उपाय करण्याच्या बाबतीत सरकार कमालीचे उदासीन आहे.’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. शिबिरातील उपस्थित प्रतींनिधींनी या विषयावर सविस्तर चर्चा करून वक्त्यांना प्रश्न विचारले व वक्त्यांनी त्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या सत्राचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्र राज्य सचिव मंडल सदस्य रोहिदास जाधव यांनी भूषवले तर सूत्रसंचालन राज्य समिति सदस्य नितिन वाव्हळे यांनी केले.

दुसर्‍या सत्रात शिक्षणतज्ञ डॉ. संजय दाभाडे यांनी ‘दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक परिस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. समाजव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था एकमेकांवर परिणाम करत असतात. भांडवलशाहीने निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेच्या बाजारू स्वरूपाचा दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले आहे. या सर्व समाजातील मुले आणि मुलींची शैक्षणिक आकडेवारी विषद केली. समाजाच्या एकूणच प्रगतीसाठी या समाजाची शैक्षणिक परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज त्यांनी सांगितली. यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी संघटित प्रयत्न करावे लागतील. या सत्राचे सूत्रसंचालन अमोल वाघमारे यांनी केले तर अध्यक्ष स्थान राज्य उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड यांनी भूषवले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad