सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2016

सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 16 प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत संस्थांना सन 2016-17 या आर्थिक वर्षात सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या सहाय्यक अनुदानासाठी अर्ज 15 जून ते 14 जुलै 2016 या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून याच वेळेत भरलेले अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

ज्या संस्था गायनवादननृत्यनाटकतमाशानकला,कठपुतलीचे खेळ तसेच लोककला या क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे जनतेसाठी नि:शुल्क सादरीकरण करतील अशा संस्था सहाय्यक अनुदानासाठी पात्र समजण्यात येतील.
सहाय्यक अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांसाठी अटी -:
संस्थानोंदणी अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असली पाहिजे. संस्थेच्या घटनेत सांस्कृतिक कार्य हा महत्त्वाचा उद्देश असावा. सहाय्यक अनुदानाकरिता अर्ज करणारी संस्था किमान 3 वर्षापासून कार्यरत असावी.
संस्थेने मागील 3 आर्थिक वर्षात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात केलेले कार्य नि:शुल्क केलेले असावे तसेच त्याद्वारे कोणतेही उत्पन्न मिळविलेले नसावे. संस्थेच्या दरवर्षीच्या हिशोबाची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी मान्यता दिलेल्या किंवा संमती दिलेल्या परिक्षकांकडून किंवा सनदी लेखापालाकडून करण्यात यावी. मागील 3 आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणाच्या अहवालाच्या प्रतीत नफा/ तोटा पत्रकजमा व खर्च लेखेताळेबंदप्रयोगात्मक कलेवर केलेल्या खर्चांच्या बाबींचा तपशील देणे आवश्यक असून सनदी लेखापालांचे लेखा परिक्षणात्मक अहवाल नमूद केलेला असणे आवश्यक आहे. संस्थेस एकदा अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढील तीन वर्षे सहाय्यक अनुदान मिळणार नाही. चौथ्या वर्षी योजनेच्या निकषाच्या आधारे संस्थेच्या अर्जाचा अनुदानासाठी विचार करण्यात येईल.
प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या तीन संस्थांना अनुदान देण्यात येणार
ज्या संस्था प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी कार्य करीत आहेत अशा तीन संस्थांना अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी या संस्थेने लुप्त होणाऱ्या कलांचे तसेच आदिवासी कलांचे पुनरुज्जीवनसादरीकरण व दस्ताऐवजीकरण यासाठी कार्य केले पाहिजे. दुर्मिळ कलासाहित्य (लिखित व दृकश्राव्य)वाद्य व सामुग्री याबाबींचे जतन/ संग्रह/ प्रदर्शन त्याचप्रमाणे दुर्मिळ ध्वनीमुद्रिकांचे श्रवणसत्र कार्यक्रम आयोजित करण्याचे कार्य,
विशेष बालकांसाठी (मतिमंदअंधअपंगमूकबधीर तसेच बालगृह/ निरीक्षण गृहातील बालके) प्रयोगात्मक कलेचे प्रशिक्षण तसेच विशेष बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे कार्य करत आहेत,अशा संस्था या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्था या अनुदानासाठी पात्र ठरतील.
संस्थांनी प्रयोगात्मक कलेचे सादरीकरणजतन व संवर्धन करताना जातीय किंवा धार्मिक विद्वेष उफाळून येईल किंवा बळावेल,असा कोणताही कार्यक्रम सादर करता येणार नाही. संस्थांनी चुकीची कागदपत्रे सादर करुन सहाय्यक अनुदान प्राप्त केल्याचे आढळून आल्यास त्या संस्था भविष्यात शासनाच्या अनुदानासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येतील.
विहित नमुन्यातील अर्ज व नियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरातसांस्कृतिक संस्थांना सहाय्यक अनुदान’ या शीर्षाखाली उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयजुने सचिवालयविस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधी मार्ग,मुंबई-32. (दूरध्वनी क्रमांक 022-22043550) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad