मुंबई, दि. 2 : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे हौसिंग ॲड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, श्रेयस चेंबर्स, पहिला माळा 175,डॉ.डी.एन.रोड, फोर्ट येथे स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी दिली.
प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे की, नगरविकास विभागाने मुंबई मेट्रो मार्ग 3कुलाबा-बांद्रा-सिप्झ मार्गिकेवरील प्रकल्प अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. त्याकरिता फ्री प्रेस जर्नल मार्गावरील शासकीय तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे कळविल्याने त्यानुसार या कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. या स्थलांतरामुळे कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक देखील बदलण्यात आला असून नवीन दूरध्वनी क्रमांक 022-22626303 असा आहे. तरी या बदलाची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment