मुंबई ( प्रतिनिधी ) - काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून जेष्ठ नेते गुरुदास कामत यानी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकानी राजीनामा परत घ्यावा यासाठी बुधवारी मुंबई प्रदेश कार्यालयासमोर जोरदार शक्ति प्रदर्शन केले. यामध्ये माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश होता. दरम्यान कामत यानी येत्या दोन दिवसात राजीनामा परत घेतला नाही तर मुंबई पालिकेतील जवळपास 25 समर्थक नगरसेवक राजीनामा देतील असे नगरसेवक देवेन्द्र आंबेरकर यानी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुक काही महिन्यावर आली असताना कांग्रेस मधील गटबाजी चे राजकारण चव्हाटयावर येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून पक्षात चांगली वागणूक मिळत नसल्याने कामत नाराज होते. या नाराजीकडे पक्षश्रेष्टिनेही दुर्लक्ष केल्याने कामत व त्यांच्या समर्थकामध्ये संताप खदखदत होता. कॉंग्रेसमधील दोन्ही गटातला वाद मिटवण्या पेक्षा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मंगळवारी कंटाळून कामत यानी राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेतल्याचे जाहिर केले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामत यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याने राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा फटका बसणार आहे.
कामत यानी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या शेकडो समर्थकानी पक्ष कार्यालया समोर जोरदार शक्ति प्रदर्शन करुन श्रेष्टींचे लक्ष वेधले. पालिकेतील जवळपास 25 म्हणजे निम्मे नगरसेवक कामत गटाचे असल्याने त्यानीही शक्तिप्रदर्शन करुन राजीनामा देण्याचा इशारा दिला. याचे पडसाद दिल्लीपर्यत उमटले. त्यांची नाराजी आता दूर करण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठी कडून सुरु झाला आहे. दरम्यान आधीच काँग्रेस मध्ये कमालीची आलेली मरगळ ती दूर करण्या ऐवजी दोन्ही गटातील अंतर्गत असलेला संघर्ष बाहेर आल्याने तो मिटवण्या साठी आता श्रेष्टींचा प्रयन्त सुरु झाला आहे. हां वाद लवकर मिटवता आला नाही तर आगामी पालिका निवडणुक पक्षाला जड़ जाईल अशी चर्चा आहे. पक्षात निरुपम व् कामत गट असल्याचे लपून राहिलेले नाही.
पालिकेतील विरोधी पक्षनेते पद जाणार ?
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यानी राजीनामा दिल्यानंतर याचे पडसाद कामत समर्थक नगरसेवकांमध्ये चांगलेच उमटले आहेत या कामत नगरसेवक 25 समर्थकांनी राजीनामा दिल्यास पालिकेतील काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्ष नेते पद जाण्याची शक्यता आहे काँग्रेसकडे सध्या 51 नगरसेवक आहेत यातून 25 नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास काँग्रेस पक्षाकडे 26 नगरसेवक राहणार आहेत त्यामुळे कोंग्रेसपेक्षा अधिक संख्या असलेल्या मनसे पक्षाकडे हे विरोधी पक्ष नेते पद जाईल. मनसेचे 28 नगरसेवक आहेत त्यामुळे कामत समर्थक नगरसेवकांनी राजीनामा दिल्यास काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

No comments:
Post a Comment