पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील नियतकालिकांच्या खरेदीच्या चौकशीचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2016

पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील नियतकालिकांच्या खरेदीच्या चौकशीचे आदेश

मुंबई / प्रतिनिधी 22 June 2016 - मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियतकालिके खरेदी करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी स्थायी समितीमधे केला होता. यावर प्रशासनाने सदर नियतकालिकांचे दरपत्रक स्थायी समितीत सादर केले. परंतू देशपांडे यांनी या नियतकालीकांची किम्मत 38 हजार ते 75 हजार आहे. नियतकालिके घेताना डिस्काउंटही दिले जाते मग वैद्यकीय महाविद्यालयासाठी असे डिस्काउंट का मिळू शकत नाही असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयासाठी खरेदी केलेल्या नियतकालिकांच्या किमती दोन कोटी रुपए आहे. या नियतकालिकांची किंमत चक्क पाच ते आठ लाख रुपये आहे़. आयुक्त ५० ते ७५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च आपल्या अधिकारात करू शकतात़ केईएम रुग्णालयासाठी २५ एप्रिल रोजी प्रमुख रुग्णालयाच्या संचालकांनी खरेदी केलेली नियतकालिका तब्बल पाच लाख ५८ हजार रुपये एवढ्या किमतीची होती़ दुसरीची किंमत सहा लाख ६२ हजार रुपये होती, तर अन्य दोन नियतकालिकांची प्रत्येकी आठ लाख ५४ हजार रुपये किंमत होती़. अशा पाच ते आठ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या नियतकालिका कोणत्या? असा प्रश्न मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला़ मागील बैठकीत केला होता. तर ई-मॅगझिनच्या काळात करोडो रुपयांची पुस्तके कसली खरेदी करता? असा प्रश्न भाजपाचे दिलीप पटेल यांनी केला़ होता. ही नियतकालिके वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी खरेदी करण्यात आल्या आहेत़ यासाठी केवळ दोन कोटी रुपये खर्च झाले असल्याचे अजब स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad