मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, शौचालय, प्रसुतीगृहात प्रायोगिक तत्वावर स्यानिटरी न्यापकीन वेंडिंग मशीन लावली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई औद्योगीक राजधानी आहे. मुंबईत नोकरी निमित्त बाहेर पडणाऱ्या महिला, मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईमधे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. अशा गरीब महिलांना दुकानात जाऊन स्यानिटरी न्यापकीन मागण्यास संकोच निर्माण होतो. विविध कंपन्यांचे स्यानिटरी न्यापकीन आर्थिकदृष्टया परवडण्यासारखी नाही. झोपडपट्टी वसाहतीतील महिला मुली न्यापकिन शौचालयांमधे टाकत असल्याने शौचालय मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्यामुले नागरिकांना त्रास होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी ऑटोम्याटिक वेंडिंग मशीन मशीन इंसिनरेटच्या सुविधेसह सार्वजनिक स्वच्छतागृह, महापालिकेच्या शाळा, कार्यालय, प्रसुतीगृह इत्यादी ठिकाणी स्यानिटरी न्यापकीन वेंडिंग मशीन लावले जाणार असल्याचे राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत हे मशीन लावले जाणार असून यासाठी पालिकेला वेगला खर्च करावा लागणार नाही. अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी येत्या 8 ते 10 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून प्रशासनाचा निर्णय झाल्यावर सार्वजनिक स्वच्छतागृह, महापालिकेच्या शाळा, प्रसुतीगृह या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रत्तेकी 5 मशीन लावल्या जाणार आहेत. शाळांमधे या मशीन मधून मोफत न्यापकिन मिळणार असले तरी इतर ठिकाणी मात्र 10 रुपयांत 3 न्यापकिन मिळणार असल्याचे राजश्री शिरवडकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment