अवैध बांधकामप्रकरणी काँग्रेसच्या विनिता वोरा यांचे नगरसेवकपद धोक्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2016

अवैध बांधकामप्रकरणी काँग्रेसच्या विनिता वोरा यांचे नगरसेवकपद धोक्यात

मुंबई / प्रतिनिधी – बेकायदा बांधकामाप्रकरणी वादात अडकलेल्या विलेपार्ले वॉर्ड क्र. ६५ च्या काँग्रेसच्या नगरसेविका विनिता वोरा यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने वोरा यांच्या पतीने केलेल्या बेकायदा बांधकामाची पाहणी करून त्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील निर्णय पालिका आयुक्तांना सहा आठवड्यांत घ्यावा असा आदेश दिला.

नगरसेविका विनिता वोरा यांच्या पतीने आपल्या बंगल्यासमोर बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करून शिवसेना माजी उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत वोरा यांना अपात्र ठरविण्याची विनंती उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. वोरा यांनी १ एप्रिल २०११ नंतर पाडण्यात आलेल्या बांधकामानंतर पुन्हा अतिरिक्त बांधकाम केले आहे का याची पाहणी करावी तसेच वोरा यांच्या अपात्रतेबाबत सहा आठवड्यांत निर्णय घेऊन अहवाल सादर करावा असा आदेश दिला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad