मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नवनियुक्त महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज पदभार स्वीकारला. सिंह यांनी यावेळी महासंचालनालयातील विभाग प्रमुखांची बैठक घेवून महासंचालनालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ यांनी सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
सिंह हे भारतीय पोलीस सेवेतील 1996 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. माहिती तंत्रज्ञान, मानसशास्त्र, लोकप्रशासन या विषयांतील ते तज्ज्ञ असून त्यांनी नागपूरच्या व्हीएनआयटी या संस्थेतून बी.ई. केले आहे. सध्या ते मानसशास्त्र या विषयात पीएच.डी करीत आहेत. सिंह यांनी लिहीलेले ‘क्वांटम सीज’ हे पुस्तक पेंग्विन या प्रकाशनाकडून तर अन्य पुस्तक हार्परकॉलिन्स प्रकाशनाकडून प्रसिध्द झाले आहे. ‘द कोलॅबोरेटिव्ह फॉर ग्लोबल ॲण्ड बिग हिस्ट्री’ या पुस्तकाच्या लेखन कार्यातही त्यांचे योगदान आहे.
सिंह हे सध्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर आणि महिलांविरोधी गुन्हे शाखेचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत असून माहिती महासंचालक पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी सिंह यांनी नागपूर येथे विशेष शाखा उपायुक्त, अमरावती व औरंगाबाद येथे जिल्हा पोलीस अधीक्षक, मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त, यासह राज्य राखीव पोलीस दल, पोलीस वाहतूक शाखा आदी ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
No comments:
Post a Comment