मुंबई- सोसायटी फॉर क्लीन एन्व्हायरमेन्ट (सोक्लीन) आणि ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २३ जून २०१६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, दादर (पश्चिम) पाण्याचे लेखापरिक्षण : आज आणि उद्यासाठी या विषयावर एकदिवसीय जलपरिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पाण्याचे लेखापरिक्षण या विषयावर महाराष्ट्रात अशाप्रकारची पहिलीच जलपरिषद होणार आहे. ही परिषद सर्वांसाठी मोफत आहे.
पर्यावरण तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. ए. डी. सावंत अध्यक्ष असलेल्या सोसायटी फॉर क्लीन एन्व्हायरमेन्ट (सोक्लीन) या संस्थेतर्फे या परिषदेचे आयोजन होत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचे जतन करण्यासाठी पाण्याचे लेखापरिक्षण होणे आवश्यक आहे. या हेतुनेच या जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले असून जलतज्ज्ञांसोबत, जल अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, पाणीप्रेमी नागरिकांनी या परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन सोसायटी फॉर क्लीन एन्व्हायरमेन्ट (सोक्लीन)चे अध्यक्ष डॉ. ए. डी. सावंत यांनी केले आहे. ही परिषद सर्वांसाठी मोफत असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. पूर्वनोंदणीसाठी सोक्लीनचे सरचिटणीस डॉ. अवकाश कुमार- ७२०८२ ४६६१७, ९९६९१ ३८६९३ संदीप तायडे- ७७१९८ २४२१४ यांच्यांशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment