आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याप्रकरणी भारिप डाव्याचे २९ जूनला राज्यव्यापी आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2016

आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याप्रकरणी भारिप डाव्याचे २९ जूनला राज्यव्यापी आंदोलन

- आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्याप्रकरणी चौकशीची मागणी 
मुंबई ।  प्रतिनिधी 27 June 2016
दादर येथील आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेले भवन जमीनदोस्त केल्याप्रकरणी सोमवारी वरळीसह मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. भवन नेमके कोणी जमीनदोस्त केले त्याच्या चौकशीसाठी भारीप बहुजन महासंघप्रणीत लोकशााही डाव्या आघाडीच्या वतीने बुधवारी (दि.२९) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारिप अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आंबेडकर भवन मोडकळीस आलेली वास्तु नव्हती. परंतु, मुंबई महापालिकेने कुठलीही चौकशी न करता तोतया ट्रस्टींशी संगनमत करुन तीला धोकादायक ठरवले व ती पाडण्यास संमती दिली. त्यावर आम्ही अपील केले व पुन्हा वास्तुची आॅडीट करण्याचे ठरले. त्यामुळे सध्याच्या बेकायदा ट्रस्टींनी रात्रीच्या अंधारात भवन जमीनदोस्त केले, असा अारोप अॅड. प्रकाश आबंडेकर यांनी केला आहे.

या भवनची जमीन बाबासाहेबांनी खरेदी केली होती. तेथे त्यांनी बुद्धभूषण प्रिटींग प्रेस टाकला. उरलेल्या जमीनीचा ट्रस्ट केला. विजय रणपीसे, रत्नाकर गायकवाड आदी तोतया ट्रस्टींना भवनाच्या जागी टाॅवर बांधायचा आहे. या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करायचा आहे. त्यांना आंबेडकरी चळवळीचे केंद्र नेस्तनाबूत करायचे आहे. म्हणून त्यांनी भाडोत्री गुंडांचा वापर करुन भवन जमीनदोस्त केले, अशी टिका आनंदराज आंबेडकर यांनी केली. 

आंबेडकर भवन प्रकरणी सोमवारी वरळी, रमाबाई आंबेडकर नगरसह मुंबईतील अनेक वस्त्यांत बंद पाळून निषेध करण्यात आला. या आंदोलनाचा विस्तार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी या प्रकरणी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकशाही डाव्या आघाडीतील सर्व घटक पक्षही सहभागी होणार आहेत. 

आंबेडकर भवनमधील ज्या प्रिंटींग प्रेसवर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत आदी चळवळींची मासिक सुरु केली, त्या प्रेस व मशीनचे बुलडोझर फिरवल्याने नुकसान झाले आहे. बाबासाहेबांच्या काळातले या मासिकांचे जुने अंक, बाबासाहेबांच्या भाषण पुस्तिका, जुनी पत्रे, ज्ञाती बैठकांची इतिवृत्ते, हॅडीबील्स आदी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाल्याचा दावा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad