मुंबई / प्रतिनिधी
मनपाच्या शाळेत प्रत्यक्ष हजर न रहता मस्टरवर खोट्या सह्या करण्याची प्रकरणे आज शिक्षण समितीच्या बैठकीत उजेडात आल्याने खळबळ उडाली. हा सर्व प्रकार मुख्याधाक यांच्या संगनमताने सुरु असून ही या प्रकरणात अधिकाऱ्यांना उत्तर देण्यास मज्जाव करत समिती अध्यक्ष हेमांगी वरळीकर हस्तक्षेप करत प्रस्ताव राखून ठेवला.
शिक्षण समिती भाजप सदस्य शिवनाथ दराडे यांनी आज झालेल्या बैठकीत परेल येथील गणपतराव कदम मार्ग माध्यमिक शाळा, दहिसर येथील आनंदनगर मनपा शाळा आणि विक्रोळी येथील पार्कसाईट हिंदी प्राथमिक शाळा या शालांमध्ये प्रत्यक्ष हजर न राहता शिक्षक मस्टरवर खोट्या सह्या करण्याची प्रकरणे समोर आणले.
हा प्रकार गणपतराव कदम मार्ग मनपा माध्यमिक शालेत मुखाध्यापिकेच्या संगनमताने 3 वर्षे सुरु होता. याबाबत प्रशासनाने चौकशी करून अहवाल अतिरिक्त आयुक्ताकड़े पाठविला. अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी समंती दिल्यावर सबंधित मुख्याध्यापिकेची बदली होऊन चौकशी करण्यास सांगितले.
मात्र मुख्याधाक यांची बदली झाल्यानंतरही 3 महीने शाळेच्या चाव्या आणि कागद पत्रे दिलीच नाही. मात्र तरीही शिक्षण समिती अधक्ष्य हेमांगी वरलीकार यांनी पत्रा द्व्यारे त्यांची बदली रद्द करण्याचे पत्र उपायुक्त याना दिले. तसेच स्थानिक नगरसेवक यांच्या दबावामुळे चौकशी न करताच बदली रद्द करण्यात आली, असे दराडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment