धारावीत मेणबत्ती मोर्चा - १४ जून रोजी आझाद मैदानातही मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 يونيو 2016

धारावीत मेणबत्ती मोर्चा - १४ जून रोजी आझाद मैदानातही मोर्चा

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर १ मधील चाळी आणि इमारतींतील रहिवाशांना, डीआरपी प्रकल्पात ४0५ चौरस फूट घरे देण्यावर सरकार ठाम असल्याच्या निषेधार्थ, धारावीकारांनी माटुंगा लेबर कॅम्प येथून समतानगर ते बालिगानगरपर्यंत डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती संघाच्या नेतृत्वाखाली मेणबत्ती मोर्चा काढला. याच आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून आता १४ जून रोजी आझाद मैदानातही मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.  



धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर १ मधील माटुंगा लेबर कॅम्पमधील इमारती, चाळी आणि शाहूनगर, बालिगानगर, गीतांजलीनगर, आर.पी. नगरमधील रहिवाशांना विश्‍वासात घेण्यात आले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शिवाय, ७५0 चौरस फुटांच्या घरांच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत, रेल्वेलगतच्या वगळण्यात आलेल्या झोपड्यांनाही पुनर्विकासात सामावून घ्यावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती संघाच्या नेतृत्वाखाली हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात रहिवासी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad