मुंबई / अजेयकुमार जाधव / 10 June 2016
आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात 51 हॉट लाइन कार्यरत करण्यात आल्या आहेत. या हॉट लाइन्स पालिकेची 24 प्रशासकीय विभाग कार्यालये व 27 बाह्य यंत्रणाना जोडण्यात आल्या आहेत. आणिबाणीच्या प्रसंगी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आली आहे. आपत्ती प्रसंगी नागरिकांनी 1916 / 22694725 / 27, 22704403 फ्याक्स 22694719 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी केले आहे.
मुंबईमधे पाणी साचणारी ठिकाणी आणि मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी लावलेल्या सीसीटिव्ही क्यामेरामधून परस्थितीवर देखरेख ठेवली जाणार आहे. पालिकेच्या 24 विभागीय नियंत्रण कक्षामधे 3 सत्रांमधे 72 तसेच पर्यायी 12 असे एकूण 84 कर्माचारी कार्यरत असणार आहेत. यावर्षी प्रथमच नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपत्ती प्रसंगी तात्पुरता निवारा म्हणून पालिकेच्या प्रत्तेक विभागात 5 शाळा तात्पुरते निवारे म्हणून घोषित करण्यात आले आहे. आपत्ती किंवा पुरस्थितीमधे मदतीसाठी कार्यरत असलेले पालिकेचे कर्मचारी ओळखता यावेत म्हणून सर्व कर्मचार्याना रिफ्लेक्टिव्ह ज्याकेट्स देण्यात आले आहेत. प्रत्तेक विभाग कार्यालयाला आकस्मिक खर्च म्हणून एक लाख रुपयांचा निधी देण्यात असल्याची माहिती कुंदन यांनी दिली.
मुंबईमधे पुरस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याकरीता 20 जिवरक्षक तराफे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. समुद्र किनारी धोक्याच्या सूचना देणारे 20 फलक लावण्यात आले आहेत. समुद्र किनारे व चौपाटीवरील सुरक्षेकरिता अग्निशमन दलाला लागणारी साधनसामुग्री देण्यात आली आहे. नौदलाची 5 पूर बचाव पथके, भारतीय तटरक्षक दलाची 4 पथके, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्या कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्याही 6 तुकड्या पुरस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आल्याचे कुंदन यांनी सांगितले. समुद्र किनारी पालिकेचे 11 लाइफ़ गार्ड असून कंत्राटी पद्धतीने 28 ते 30 लाइफ़ गार्ड तैनात करण्यात येणार असल्याचे कुंदन यांनी सांगितले.
वृक्ष अवेक्षक 24 तास ऑन डयूटीमुंबईत पावसाच्या दिवसात झाडे पडण्याचे प्रकार सर्रास होतात. मुंबईमधे 52942 झाडे धोकादायक आहेत त्यापैकी 33 हजार झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. झाडे पडून मागील वर्षी 9 लोकांचा मृत्यु झाला असल्याने 571 अतीधोकादायक झाडांपैकी 510 झाडे तोड्न्यात आली आहेत. उर्वरीत 61 झाडे लवकरच तोड्न्यात येतील. पावसात झाडे मोठ्या प्रमाणात पडत असल्याने वृक्ष अवेक्षक 3 पाळ्यामधे कार्यरत असणार आहेत.
अतीधोकादायक इमारती / स्थळाना नोटिसमुंबईमधे म्हाडाच्या 23, खाजगी 633, तर पालिकेच्या 84 अतीधोकादायक इमारती आहेत. या धोकादायक इमारती खाली करण्याच्या नोटिस देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या इमारती या कर्मचाऱ्यांच्या असून या इमारती खाली करण्यात येत आहेत. तसेच मुंबईत दरड कोसळणारी 282 ठिकाणे आहेत. अश्या धोकादायक ठिकाणी राहणाऱ्याना 2491 नोटिस बजावण्यात आल्या असून धोकादायक ठिकाणे खाली करण्यास सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment