पालिका रुग्णालयातही ऱ्याट किलर नियुक्त केले जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2016

पालिका रुग्णालयातही ऱ्याट किलर नियुक्त केले जाणार

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधे उंदरांचा सुळसूलाट असताना उंदरानी महापालिकेच्या रुग्णालयातही आपला उद्रेक सुरु केला आहे. यामुले नागरिकांना आणि रुग्णाना होणार त्रास कमी करण्यासाठी पालिका रुग्णालयातही ऱ्याट किलर नियुक्त केले जातील अशी माहिती आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली आहे.
पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी आढावा बैठक घेतली असून लेप्टोस्पायरेसिस होऊ नय म्हणून तबेल्यावाल्याना नोटिस दिल्याचे सांगितले. परंतू लेप्टोस्पायरेसिस ज्या उंदरामुले होतो त्याचा बंदोबस्त कसा करणार याची माहिती दिलेली नव्हती. पावसाळयात उंदीर पाण्यामधे भिजुन मृत्युमुखी पडतात आणि त्याच पाण्याशी जखम झालेल्या लोकांचा संपर्क आल्यास लेप्टोस्पायरेसिस हा आजार होतो. रुग्णालयातही रुग्णाना उंदरानी चावल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अनेक रुग्णालयात उंदरांचे प्रमाण मोठ्या संखेने वाढले आहे. यामुले यावर उपाय म्हणून रुग्णालायतही ऱ्याट किलर नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी एक उंदीर मारण्यास 10 रुपये दिले जाणार असून लोकांनी उंदीर मारण्यास पुढे यावे असे आवाहन प्रशांत कदम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad